Thursday, March 26, 2026

महायुतीमुळे आरक्षणाचा पेच सुटला, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात ओबीसी प्रमाणपत्र वाटप

महायुतीमुळे आरक्षणाचा पेच सुटला, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात ओबीसी प्रमाणपत्र वाटप

छत्रपती संभाजीनगर : महायुती सरकारने आरक्षणाचा पेच सोडवला आहे. मराठवाड्यातील मराठ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण केली आहे. सरकारच्या निर्णयानंतर आता मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. फडणवीस सरकारने हैदराबाद गॅझेटिअर लागू केले आहे. या गॅझेटिअरचा संदर्भ घेऊन कुणबी,ओबीसी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू झाले आहे.

मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटिअरनुसार कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी करत आंदोलन सुरू होते. फडणवीस सरकारने या आंदोलनाची दखल घेत समाजाला न्याय दिला आहे. शासनाने कुणबी नोंदींचा शोध घेतला. या शोध मोहिमेत अनेक जिल्ह्यात कुणबी नोंदी आढळल्या.हैदराबाद गॅझेटियर जीआरनुसार मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात साडेतीन महिन्यांमध्ये मराठा समाजाला ९८ कुणबी ओबीसी प्रमाणपत्रे मिळाली आहेत. सर्वाधिक ४४५ अर्ज हे परभणी जिल्ह्यातील आहेत. उर्वरित कुणबी अर्जाची चौकशी सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर    १४    अर्ज     0    प्रमाणपत्र जालना                         ७८   अर्ज     ८    प्रमाणपत्र बीड                             २२    अर्ज    २२   प्रमाणपत्र लातूर                           १२    अर्ज     ९    प्रमाणपत्र धाराशिव                      १३    अर्ज     ४    प्रमाणपत्र परभणी                     ४४५    अर्ज   ४७   प्रमाणपत्र हिंगोली                          ५    अर्ज    ३     प्रमाणपत्र नांदेड                            ५    अर्ज    ५     प्रमाणपत्र

Comments
Add Comment