Wednesday, December 10, 2025

हिवाळी अधिवेशन नागपुरात, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत

हिवाळी अधिवेशन नागपुरात, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत

नवी दिल्ली : राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र बुधवारी रात्री दिल्लीत होते. त्यांनी शरद पवारांची दिल्ली भेट घेतली. शरद पवारांचा शुक्रवार १२ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यांना शुक्रवारी ८५ वर्षे पूर्ण होतील. पण वाढदिवसाआधीच शरद पवारांच्या दिल्लीतील बंगल्यावर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेहभोजनासाठी निवडक लोकांना आमंत्रण दिले होते. आमंत्रितांमध्ये अजित पवार होते. यामुळेच अजित पवार बुधवारी रात्री दिल्लीत होते.

शरद पवारांच्या घरी स्नेहभोजनासाठी अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रवीण तटकरे हे पण उपस्थित होते. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी तसेच पीसी चाको, देशाचे रेल्वे राज्यमंत्री नवनीत बिट्टू, काँग्रेस खासदार मनीष तिवारी, तृणमूल काँग्रेसचे सौगत राय, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ, माजी मंत्री डी पुरंदरेश्वरी हे पण उपस्थित होते.

स्नेहभोजनाला देशाचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे त्यांच्या मुलीसह खासदार प्रणिती शिंदेंसह उपस्थित होते. या व्यतिरिक्त शरद पवारांच्या घरी स्नेहभोजनासाठी खासदार अमोल कोल्हे, अमर काळे,निलेश लंके,खासदार भगरे गुरूजी,बाळ्या मामा म्हात्रे,धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते.

Comments
Add Comment