धनबाद: अदानी समुह पुढील ५ वर्षात ७५ अब्ज डॉलर रूपये झारखंडमध्ये गुंतवणूक करणार आहे असे दस्तुरखुद्द उद्योगपती व समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी म्हणाले आहेत. एका कार्यक्रमात बोलताना लोकांना कोळशातील गुंतवणूक पारंपरिक अर्थव्यवस्थेतील वाटू शकते पण या उर्जेशिवाय नवी अर्थव्यवस्था चालणे शक्य नाही ' असे विधान त्यांनी केले आहे. अदानी समुह झारखंडमध्ये खासकरून धनबादमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार असल्याचेही अदानी यांनी स्पष्ट केले आहे. झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीच्या संधी आहेत. येणाऱ्या नजीकच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेत प्रगती दिसले. लोकांना ही पारंपरिक अर्थव्यवस्था वाटू शकते पण हिच्याशिवाय नवी अर्थव्यवस्था चालणार नाही' असे विधान गौतम अदानी यांनी केले आहे.
या ७५ अब्ज डॉलर व्यतिरिक्त समुह मोठ्या प्रमाणात देशातील इतर भागातही गुंतवणूक वाढवत आहे. यापूर्वी अदानी समुहाने गुजरात खावडा येथे जगातील सर्वात मोठे ५२० किलोमीटर परिसरात पसरलेले अक्षय उर्जा (Renewable Energy) प्रकल्पाची घोषणा केली होती. आर्थिक वर्ष २०३० पर्यंत पार्क ३० गिगावॉट क्षमतेचा प्रकल्प उभारेल असे कंपनीने नमूद केले होते. याशिवाय बोलताना अदानी म्हणाले आहेत की,'सहयोगी जागतिक व्यापार आणि पुरवठा साखळ्यांचे युग कोसळत आहे. दुर्मिळ खनिजांवरील संघर्ष, शुल्क आणि मोडलेले करार नित्याचे होत आहेत आणि प्रमुख संस्थांना त्यांच्या दीर्घकाळापासूनच्या नियमांवर पुनर्विचार करण्यास भाग पाडत आहेत.'धनबाद येथील प्रकल्पाबाबत बोलताना गौतम अदानी यांनी स्पष्ट केले आहे की,'१० गिगावॉट क्षमतेचे प्रकल्प आधीच कार्यान्वित झाल्यामुळे कंपनी जगातील सर्वात कमी खर्चाची हरित ऊर्जा प्रदान करण्याच्या मार्गावर आहे'






