मोहित सोमण: सुरूवातीच्या कलात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. प्री ओपन बाजारात सेन्सेक्स १०० व निफ्टी ३९.४५ अंकांने उसळरा आहे. शेअर बाजारात सकाळपासून चांगल्याच तेजीचे संकेत मिळत असून मुख्यतः युएस बाजारात फेड रिझर्व्ह बँकेने २५ बेसिस पूर्णांकाने कपात केल्याने शेअर बाजारात दिवसभरात तेजीची अपेक्षा कायम आहे. सकाळी गिफ्ट निफ्टीत (०.३६%) वाढ झाल्याने आज खासकरून बँक, मेटल, रिअल्टी, आयटी शेअर्सकडे गुंतवणूकदारांचे अधिक लक्ष केंद्रित झालेले असेल. नुकतीच आरबीआयकडून रेपो दरात कपातीनंतर युएसने घेतलेल्या दरकपातीच्या निर्णयामुळे शेअर बाजारात आज उत्साहाचे वातावरण कायम असू शकते. असे असले तरी फेड गव्हर्नर जेरोमी पॉवेल यांच्या वक्तव्यानंतर आशियाई बाजारात गुंतवणूकदारांनी काहीशी चिंता व्यक्त केल्याने बाजारात संपूर्ण तेजी नसून सकाळी संमिश्र प्रतिसाद कायम आहे. दरम्यान बाजारातील तेजीमुळे भारतीय शेअर बाजार तज्ञांच्या मते निफ्टी ५० हा २५६५० -२५९०० दरम्यान पातळीवर स्थिरावू शकतो.
प्री ओपन सत्रात सेन्सेक्स निफ्टी व्यतिरिक्त आज बँक निर्देशांकातही तेजी दिसत असून मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये कालच्या नफा बुकिंगनंतर वाढ झाली असून सर्वाधिक वाढ क्षेत्रीय निर्देशांकातील आयटी, मेटल, पीएसयु बँक, फायनांशियल सर्विसेस एक्स बँक निर्देशांकात झाल्याचे दिसून आले आहे. मोठ्या हेवी वेट शेअरमध्ये आज चांगली वाढ अपेक्षित असून सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, टीसीएस, इन्फोसिस शेअर्समध्ये झाली असून घसरण अँक्सिस बँक, भारती एअरटेल, एचसीएल टेक्नॉलॉजी, अदानी एंटरप्राईजेस या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.
व्यापक शेअर बाजारात मात्र फेडने व युएस बाजारातील तज्ञांच्या मते दरकपातीनंतरही युएस बाजारात अर्थव्यवस्थेत चांगले संकेत मिळत नसल्याने संमिश्र प्रतिसादही दिवसभरात मिळू शकतो. फेडच्या वक्तव्यांचा साईड इफेक्ट येणाऱ्या काळात बसण्याची शक्यता असून बाँड खरेदी वाढवल्यानंतरही महागाई नियंत्रित करण्याचे आव्हान युएस समोर कायम आहे. याच कारणामुळे युएस बाजायासह आशियाई बाजारात 'संमिश्र' तेजीचे संकेत आज मिळाले आहेत. अखेरच्या सत्रात युएस बाजारातील डाऊ जोन्स (०.३५%) घसरण वगळता एस अँड पी ५०० (०.६८%), नासडाक (०.३६%) बाजारात वाढ झाली आहे. आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलात गिफ्ट निफ्टी (०.३२%) फायदा झाला असून इतर निर्देशांकात संमिश्र प्रतिसाद कायम आहे. स्ट्रेट टाईम्स (०.३२%), हेंगसेंग (०.०९%), जकार्ता कंपोझिट (०.१७%) निर्देशांकात वाढ झाली असून सर्वाधिक घसरण तैवान वेटेड (१.०८%), शांघाई कंपोझिट (०.४१%), सेट कंपोझिट (०.७०%), निकेयी २२५ (१.००%) निर्देशांकात झाली आहे.
सुरूवातीच्या कलात सर्वाधिक वाढ सुप्रीम इंडस्ट्रीज (९.९८%), मुथुट फायनान्स (४.१२%), ग्राफाईट इंडिया (३.२५%), टाटा केमिकल्स (२.४३%), त्रिवेणी इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज (२.०१%), श्रीराम फायनान्स (१.६७%), किर्लोस्कर ब्रदर्स (१.५१%) या समभागात वाढ झाली असून सर्वाधिक घसरण बलरामपूर चिनी (४.४१%), एमएमटीसी (३.६३%), गुजरात फ्लुरोक (३.०३%), झेन टेक्नॉलॉजी (२.७९%), टाटा कंज्यूमर (२.२०%), ट्रायडंट (१.८४%), एचडीएफसी एएमसी (१.४३%) समभागात झाली आहे.






