मोहित सोमण: युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात झाल्यानंतर आज तीन सत्रांच्या घसरणीनंतर आज वाढ झाली आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात सेन्सेक्स ४२६.८६ अंकाने उसळत ८४८१८.१३ पातळीवर स्थिरावला असून निफ्टी १४०.५५ अंकाने उसळत २५८९८.५५ पातळीवर स्थिरावला आहे. त्यामुळे निफ्टीला २५९०० च्या पातळी आसपास जाण्यास यश आले आहे. सेन्सेक्स बँक ३३८ व बँक निफ्टीत २४९ अंकांनी वाढ झाल्याने बाजारात दिवसभरात तेजीचे स्थैर्य कायम राहिले असून अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) ४.६९% कोसळला होता. मिडकॅप निर्देशांकासह ऑटो, आयटी, मेटल, कंज्यूमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, मिड स्मॉल फायनांशियल सर्विसेस शेअर्समध्ये झालेल्या वाढीचा फायदा बाजारात झाला असला तरी मिडिया, तेल व गॅस निर्देशांकात किरकोळ घसरण झाली. एकूणच रूपयातील निचांकी घसरण, वाढती डॉलर पातळी, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी फेड दर कपातीमुळे काढून घेतलेली गुंतवणूक व तेलाच्या व कमोडिटी बाजारातील रिकव्हर झालेल्या किंमती, भारतीय मजबूत फंडामेंटल व टेक्निकल पोझिशनआधारे शेअर बाजारात आज वाढ नोंदवली गेली आहे.
मात्र तज्ञांच्या मते, युएस बाजारातील २५ बेसिस दरकपात भारतीय बाजारात काय प्रमाणात प्रभावित करेल हे आगामी युएस बाजारातील मायक्रो डेटातील आकडेवारीवर स्पष्ट होईल मात्र कपातीचे परिणाम दीर्घकालीन राहिल्यास भारतीय सराफा बाजारातील व शेअर बाजारातील गुंतवणूकीत प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. मात्र जगातील आंतर बाह्य वातावरणाचा अंदाज घेता वर्षभरात आरबीआय रेपो दर कपात करू शकते. बँक ऑफ बडोदाने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार रेपो दर ५% पातळीपर्यंत खाली घसरू शकतो ज्याचा फायदा निर्यातदासह घरगुती बाजारपेठेला होईल. मात्र चलववाढ हा देखील प्रमुख चिंतेचा मुद्दा आहे. मेक्सिकोनेही भारतावर ५०% अतिरिक्त शुल्क लावल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम ऑटोमोबाईल व इतर औद्योगिक क्षेत्रात होणार असला तरी हा बाजार भारतीय बाजारात लक्ष केंद्रित करू शकतो.
याखेरीज गुंतवणूकदारांनी रशिया-युक्रेन शांतता चर्चेकडे लक्ष पुन्हा एकदा केंद्रित केल्याने कमोडिटी किंमती शिथील होऊ शकतात कारण व्हेनेझुएलाच्या किनाऱ्याजवळ अमेरिकेने मंजूर केलेला टँकर जप्त केल्यामुळे होणाऱ्या संभाव्य परिणाम आधारे आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती कमी झाल्या. आतापर्यंत, जप्तीचा बाजारावर कमीत कमी परिणाम झाला आहे परंतु पुढील वाढ कच्च्या तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण करु शकतो. दुसरीकडे आज मिडकॅप शेअर्समध्ये वाढ कायम असून बाजार तज्ञांच्या मते मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्ये प्राईज करेक्शन झालेले असून येणाऱ्या वर्षांमध्ये या शेअर्समध्ये गुंतवणूकीत चांगला परतावा मिळू शकतो.
आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात तज्ञांच्या विश्लेषणाप्रमाणेच घसरणीकडे अधिक झोकला गेला आहे. अखेरच्या सत्रात गिफ्ट निफ्टी (०.६८%) सह स्ट्रेट टाईम्स (०.२०%), वगळता इतर सर्व शेअर बाजारात नुकसान झाले आहे. सर्वाधिक घसरण निकेयी २२५ (०.८०%), तैवान वेटेड (१.३४%), सेट कंपोझिट (०.३०%) निर्देशांकात झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात एस अँड पी ५०० (०.६८%), नासडाक (०.३६%) निर्देशांकात झाली असून घसरण डाऊ जोन्स (०.१४%) निर्देशांकात झाली आहे.
आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ ओला इलेक्ट्रिक (६.७६%),नाटको फार्मा (५.७७%), डीसीएम श्रीराम (५.५६%), डिक्सन टेक्नॉलॉजी (५.१६%), व्होडाफोन आयडिया (५.९४%), केफीन टेक्नॉलॉजी (४.८९%), एसईएमई सोलार होल्डिंग्स (४.५८%), बीएसई (४.५४%), रेलटेल कॉर्पोरेशन (४.२०%), कायनेस टेक (३.८८%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण सिमेन्स इंजिनिअरिंग (३.०३%), सोभा (२.८२%), एमआरपीएल (२.५८%), वालोर इस्टेट (२.५२%), पीटीसी इंडस्ट्रीज (२.०८%), सुप्रीम इंडस्ट्रीज (१.९१%), गोदरेज इंडस्ट्रीज (१.८१%),टीबीओ टेक (१.५३%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'अमेरिकेतील महागाईच्या उच्च दरादरम्यान फेडने अपेक्षित २५-बीपीएस दर कपात केल्यानंतर देशांतर्गत बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आली. अमेरिकेतील १० वर्षांच्या उत्पन्नात घट झाल्याने भविष्यातील एफआयआयच्या बहिर्गमनात घट झाल्याचे दिसून येते, ज्यामुळे भावनांना चालना मिळाली. अपेक्षित मजबूत मागणीमुळे ऑटो क्षेत्राने उत्कृष्ट कामगिरी केली, तर खर्च वाढण्याच्या शक्यतेमुळे आयटीने जोर पकडला. याउलट, एआय चालित मूल्यांकन आणि वाढत्या जपानी उत्पन्नाबद्दलच्या चिंतेमुळे इतर आशियाई बाजारपेठांमध्ये विक्रीचा दबाव जाणवला, ज्यामुळे एकूण देशांतर्गत भावनांवर नकारात्मक परिणाम झाला.'






