ठाणे : उत्तर भारतीयांना उत्तर देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात एप्रिल २०२२ मध्ये उत्तर सभा घेतली होती. या सभेत तलवार उंचावल्या प्रकरणी राज ठाकरे, मनसे नेते अविनाश जाधव आणि शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. याच प्रकरणात आज म्हणजेच गुरुवार ११ डिसेंबरच्या सुनावणीवेळी राज ठाकरे ठाणे कोर्टात हजर होते.
उत्तर सभा ही ठाण्यात गडकरी रंगायतन येथील चौकात झाली होती. राज ठाकरेंचे सभेसाठी मंचावर आगमन होताच मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना तलवार भेट दिली होती. या पार्श्वभूमीवर सभास्थळी तलवार दाखवून हिंसेला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. राज ठाकरेंनी या प्रकरणात कोर्टात हजर राहून न्यायालयाचा आदर राखत असल्याचे कृतीतून दाखवून दिले. यानंतर न्यायालयाने आजची सुनावणी पूर्ण केली. अद्याप या प्रकरणाच निकाल आलेला नाही. निकाल काय येतो याकडे अनेकांचे लक्ष आहे.