Thursday, December 11, 2025

इंडिगोकडून १०० विमाने आज रद्द, मात्र इंडिगोकडून सेवा पूर्ववत झाल्याच्या दाव्यासह नुकसानभरपाईही जाहीर

इंडिगोकडून १०० विमाने आज रद्द, मात्र इंडिगोकडून सेवा पूर्ववत झाल्याच्या दाव्यासह नुकसानभरपाईही जाहीर

मोहित सोमण: इंडिगो एअरलाईन्सने (Interglobe Aviation Limited) कंपनीने आज बंगलोर चेन्नई यासह एकूण १०० विमाने रद्द केली असल्याचे प्रसारमाध्यमांनी स्पष्ट केली असली तरी इंडिगो विमानाने आज प्रेस स्टेटमेंट रिलीज करुन इंडिगो एअरलाईन्स पूर्ववत सुरु झाल्याचे स्पष्ट केले. 'सारख्या तारखेला गेल्या ३ दिवसात एकही विमान रद्द झाले नसल्याचे कंपनीने म्हटले असून, '९ डिसेंबर पासून कंपनीचे विमानसेवा पूर्ववत सुरू होईल' असे कंपनीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे कंपनीच्या माहितीनुसार आज किमान १९५० विमाने चालवली जातील. आज दुपारी ३ वाजेपर्यंत कंपनीचे सीईओ पीटर इलिबर्स यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश डीजीसीए (Department of Civil Aviation DGCA) विभागाने दिले आहेत. त्यामुळे रिपोर्टनुसार कंपनी झालेल्या प्रकाराबद्दल सविस्तर माहिती डीजीसीएला देऊ शकते. तसेच इंडिगो या व्यत्ययांची मुख्य कारणे आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी उचललेली पावले स्पष्ट करेल.

यामध्ये उड्डाणे पूर्ववत करण्याच्या प्रगतीचा, वैमानिक आणि केबिन क्रूसाठीच्या भरती योजनांचा, रद्द झालेल्या प्रवाशांना परतावा, अडकलेले सामान परत करण्याचा, प्रवाशांशी वेळेवर संवाद साधण्याचा आणि रद्द झालेल्या उड्डाणांमुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांच्या पुनर्वाहतुकीच्या व्यवस्थेतील प्रश्नांचा समावेश आहे. गेल्या आठवड्याच्या मध्यापासून उड्डाणे रद्द होण्याचे सत्र सुरू असल्याने डीजीसीए आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय दोघेही विमान कंपनीसोबत नियमित बैठका घेत आहेत. ज्याचा फटका विमान उड्डाण करत असलेल्या प्रवाशांना अद्याप सुरू आहे.

इंडिगो देशातील सर्वात मोठी देशांतर्गत उड्डाण सेवा देणारी कंपनी आहे. या एव्हिऐशन कंपनीचे हवाई क्षेत्रातील बाजार हिस्सा (Market Share) भारताच्या देशांतर्गत बाजारपेठेत एकूण ६५% आहे. दररोज २३०० पेक्षा जास्त उड्डाणे चालवणाऱ्या इंडिगोच्या सुधारित कपातीमुळे आता दररोजच्या देशांतर्गत उड्डाणांची संख्या १९५० पेक्षा कमी होईल

दरम्यान, इंडिगोचे बोर्ड अध्यक्ष विक्रम सिंग मेहता यांनी विमान कंपनीने हे संकट स्वतःच निर्माण केले किंवा सुधारित फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) नियमांवर सरकारवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला हे दावे त्यांनी सपशेल फेटाळून लावले आहे. आज बंगलोर चेन्नई सारख्या ठिकाणी विमाने रद्द झाली तरी सारख्या तारखेची नव्या विमानांची उड्डाणे आज एकदाही रद्द झाली नाही असा दावा कंपनीने प्रसिद्धीपत्रकातून केला. या विषयी बोलताना,'इंडिगो आपल्या कामकाजाला सातत्याने बळकटी देत आहे आणि दररोज आपल्या सेवांमध्ये सुधारणा करत आहे, ज्यामुळे आता आमच्या नेटवर्कमधील सर्व १३८ गंतव्यस्थानांना सुरळीत जोडणारी १९०० हून अधिक विमानांची उड्डाणे होत आहेत. कार्यान्वयनातील उत्कृष्टतेप्रती असलेल्या आमच्या वचनबद्धतेमुळे कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे आणि आमची वेळेवर सेवा देण्याची कामगिरी (ऑन-टाइम परफॉर्मन्स) पुन्हा एकदा सर्वोच्च औद्योगिक मानकांवर पोहोचली आहे.' अशी अधिकृत प्रतिक्रिया कंपनीने दिली.

कंपनीने आणखी काय प्रसिद्धीपत्रकात म्हटले?

'आमच्या ग्राहकांची काळजी घेणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. याचाच एक भाग म्हणून, कामकाजात झालेल्या व्यत्ययानंतर, आम्ही रद्द झालेल्या विमानांसाठी सर्व आवश्यक परतावे सुरू केले आहेत, त्यापैकी बहुतेक रक्कम तुमच्या खात्यांमध्ये आधीच जमा झाली आहे आणि उर्वरित रक्कम लवकरच जमा होईल. जर बुकिंग ट्रॅव्हल पार्टनर प्लॅटफॉर्मद्वारे केले असेल, तर तुमच्या परताव्यासाठी आवश्यक कार्यवाही देखील सुरू करण्यात आली आहे. आमच्या सिस्टीममध्ये तुमच्याकडे संपूर्ण तपशील नसल्यामुळे, आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही customer.experience@goindigo.in वर आम्हाला लिहा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्वरित मदत करणे सुरू ठेवू शकू.

इंडिगोला खेदाने हे मान्य करावे लागत आहे की, ३/४/५ डिसेंबर २०२५ रोजी प्रवास करणारे आमचे काही ग्राहक काही विमानतळांवर अनेक तास अडकून पडले होते आणि गर्दीमुळे त्यापैकी अनेकांना गंभीर त्रास झाला. आम्ही अशा गंभीरपणे प्रभावित झालेल्या ग्राहकांना १०००० रुपयांचे ट्रॅव्हल व्हाउचर देऊ. हे ट्रॅव्हल व्हाउचर पुढील १२ महिन्यांसाठी कोणत्याही भविष्यातील इंडिगो प्रवासासाठी वापरले जाऊ शकतात.

ही भरपाई विद्यमान सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार असलेल्या वचनबद्धतेव्यतिरिक्त आहे, ज्यानुसार, ज्या ग्राहकांची विमाने सुटण्याच्या २४ तासांच्या आत रद्द झाली होती, त्यांना इंडिगो विमानांच्या ब्लॉक टाइमनुसार ५००० ते १०,००० रुपयांची भरपाई देईल. इंडिगोमध्ये, आम्ही तुमच्याकडून अपेक्षित असलेला अनुभव  सुरक्षित, सुरळीत आणि विश्वासार्ह  पुन्हा पूर्ववत करण्यासाठी वचनबद्ध आहोत. तुम्हाला पुन्हा सेवा देण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद.'

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >