मुंबई : हिंदू जागे झाले नाही तर २०५० पर्यंत मुंबई मुसलमानांची झाली असेल असा धोक्याचा इशारा भाजप नेते किरीट सोमैया यांनी दिला. मुंबईत हिंदूंची लोकसंख्या ५१ टक्के असेल आणि मुसलमान ३१ टक्के असतील. पण हिंदूंच्या अंतर्गत फुटीचा आणि राजकीय उदासिनतेचा फायदा मुसलमानांना होईल. राजकीयदृष्ट्या मुसलमान मुंबईत प्रभावी झाले असतील. मग ५१ टक्के असूनही हिंदूंचे मुंबईत काय होईल याचा विचार करा.
भाजप महापौरपदासाठी लढत नाही. जे नेते महापौर,महापौर म्हणत आहेत,त्यांना पण मी सांगितलं आहे,मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे... जरा स्वतःला आवरा... कसली कॉलर टाईट? कसलं महापौर पद ? आमच्या डोळ्यासमोर मुंबई आहे, कोविडच्या काळात ठाकरे सेना कमाई करत होती. खिचडी, रेमडेसिवर घोटाळा झाला... आम्हाला मुंबई महापालिका भ्रष्टाचार मुक्त करायची आहे. मुंबई विकसित करायची आहे, हे आमचं लक्ष्य आहे. भ्रष्टाचार आणि कट्टरतेमुळे मुंबईचे नुकसान होऊ यासाठी भाजप प्रामाणिकपणे काम करत आहे, असेही किरीट सोमैया म्हणाले.
'नागपूरमध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात बोगस जन्म प्रमाणपत्र हा विषय चर्चेला आला पाहिजे. मी आतापर्यंत ३६७ बोगस जन्म प्रमाणपत्र अर्थात बर्थ सर्टिफिकेट शोधून काढली आहेत. आमदार प्रवीण दरेकर ,प्रसाद लाड आणि निरंजन डावखरे यांना या बाबत माहिती दिली आहे. विषय पटलावरती यायला हवा. महाराष्ट्रामध्ये दोन लाखाहून अधिक जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आली. उत्तर प्रदेश,पश्चिम बंगालमध्ये देखील असंच घडत आहे... अनेक एजंट पैशांच्या जोरावर बोगस जन्म प्रमाणपत्र देत आहेत. पैशांसाठी काही अधिकारी आणि कर्मचारी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या एजंटशी हातमिळवणी करत आहेत. हे थांबलेच पाहिजे... भाजप मुंबई बांगलादेशी घुसखोरांपासून मुक्त करण्यास सक्षम आहे'; असेही भाजप नेते किरीट सोमैया म्हणाले.
'टाटा इन्स्टिट्यूटने काही महिन्यांपूर्वी सखोल अभ्यास केला... ठिकठिकाणी जाऊन पाहणी केली. राज्यातल्या जन्मदराचा पॅटर्न आणि नागरिकांच्या राजकीय जागरुकतेचा आढावा घेतला.... यानंतर एक सविस्तर अहवाल सादर केला. या अहवालानुसार राजकीयदृष्ट्या २०५० पर्यंत मुंबई मुसलमानांची झाली असेल'. वेळीच सावध झालो नाही तर मुंबई कट्टरतेच्या विळख्यात अडकेल. हे आंतरराष्ट्रीय इस्लामिक संघटनेचं षडयंत्र आहे आणि ते थांबवायला हवे'; असे भाजप नेते किरीट सोमैया म्हणाले.






