Thursday, December 11, 2025

ICICI Prudential AMC कंपनीने आयपीओआधीच ४७१५ रुपयांची गुंतवणूक जमवली

ICICI Prudential AMC कंपनीने आयपीओआधीच ४७१५ रुपयांची गुंतवणूक जमवली

मुंबई: आयपीओपूर्वीच आयसीआयसीआय प्रुडेन्शियल असेट मॅनेजमेंट कंपनी (ICICI Prudential Asset Management) कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून थेट ४८१५ कोटींची गुंतवणूक प्राप्त केली आहे व उद्यापासून बहुप्रतिक्षित आयपीओ गुंतवणूकदारांसाठी दाखल होत आहे. आयसीआयसीआय बँकेची उपकंपनी (Subsidary) असलेल्या आयसीआयसीआय प्रुडेन्शियल अँसेट मॅनेजमेंट कंपनीत २६ देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूकदारांनी प्री-आयपीओ फंडिंग फेरीद्वारे ४८१५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे. बुधवारी केलेल्या सार्वजनिक घोषणेनुसार, या व्यवहाराचा एक भाग म्हणून अँसेट मॅनेजमेंट कंपनीने २१६५ रुपये प्रति शेअरच्या दराने २२२४०८४१ इक्विटी शेअर्सचे प्रायव्हेट प्लेसमेंट केले असे अधिकृत माहितीत स्पष्ट झाले आहे.

माहितीनुसार निधी उभारणीमध्ये विविध प्रकारच्या गुंतवणूकदारांनी सहभाग घेतला आहे. ज्यात लुनेट कॅपिटल, दिवंगत राकेश झुनझुनवाला यांची मालमत्ता, द रीजेंट्स ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया व आयआयएफएल अँसेट मॅनेजमेंट, सर्व इन्व्हेस्टमेंट्स, प्रशांत जैन यांच्याद्वारे व्यवस्थापित ३पी इंडिया इक्विटी फंड, पीआय अपॉर्च्युनिटीज फंड - II, ३६० वन फंड्स, व्हाईटओक कॅपिटल, एचसीएल कॅपिटल आणि बाजारातील अनुभवी मनीष चोकानी व मधुसूदन केला यांचा या गुंतवणूकीत समावेश असल्याचे सांगितले जाते.

तसेच या संस्थात्मक आणि वैयक्तिक गुंतवणूकदारांव्यतिरिक्त, एसबीआय लाईफ, एचडीएफसी लाईफ, कोटक लाईफ, आदित्य बिर्ला सन लाईफ, बजाज लाईफ, टाटा एआयजी आणि गो डिजिट जनरल इन्शुरन्स यांसारख्या अनेक विमा कंपन्यांनीही या प्री-प्लेसमेंटमध्ये भाग घेतला. इतर गुंतवणूकदारांमध्ये केदारा कॅपिटल पब्लिक मार्केट्स फंड, टीआयएमएफ होल्डिंग्स, मलाबार इंडिया फंड आणि क्लॅरस कॅपिटल I यांचा समावेश होता, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा समूह आणखी व्यापक झाला.

बाह्य गुंतवणूकदारांसोबतच, आयसीआयसीआय बँकेने स्वतः अँसेट मॅनेजमेंट कंपनीमध्ये अतिरिक्त २% हिस्सा मिळवण्यासाठी २१४० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. प्री-आयपीओ फेरी पूर्ण झाल्यानंतर, कंपनी आता तिच्या १०६०२ कोटी मूल्यांकनांच्या आयपीओसाठी सज्ज झाली आहे, जी १२ डिसेंबर रोजी उघडेल आणि १६ डिसेंबर रोजी बंद होईल, तर अँकर बिडिंग त्याच दिवशी नंतर होणार आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीने या इश्यूसाठी प्रति शेअर २०६१ ते २१६५ रुपये हा प्राईज बँड निश्चित केला. कंपनीचे सध्याचे मूल्यांकन सुमारे १.०७ लाख कोटी रुपये (११.८६ अब्ज डॉलर्स) झाले आहे. हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) स्वरूपाचा असेल, ज्यामध्ये कंपनीचा प्रवर्तक, यूके-स्थित प्रुडेन्शियल कॉर्पोरेशन होल्डिंग्स, ४.८९ कोटींहून अधिक शेअर्सची विक्री करणार आहे. याचा अर्थ कंपनीला या विक्रीतून कोणताही निधी मिळणार नाही. सध्या, आयसीआयसीआय बँकेची एएमसीमध्ये ५१% हिस्सेदारी आहे, तर उर्वरित ४९% हिस्सेदारी प्रुडेन्शियलकडे आहे.

सूचीबद्ध झाल्यानंतर, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी ही भारतीय शेअर बाजारात पदार्पण करणारी पाचवी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी बनणार आहे. जी एचडीएफसी एएमसी, यूटीआय एएमसी, आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी, श्रीराम एएमसी आणि निप्पॉन लाइफ इंडिया ॲसेट मॅनेजमेंट यांच्या पंक्तीत सामील होईल. तसेच, आयसीआयसीआय बँक, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ, आयसीआयसीआय लोम्बार्ड आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज नंतर सूचीबद्ध होणारी ही आयसीआयसीआय समूहाची पाचवी कंपनी असेल. ही कंपनी १९ डिसेंबर रोजी शेअर बाजारात पदार्पण करणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >