ठाणे : दहशतवादी कृत्यांशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या संशयावरून ठाणे जिल्ह्यात सक्तवसुली संचालनालय (ED) आणि दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. ठाणे जिल्ह्यातील पडघा गावाला लागून असलेल्या बोरीवली या गावात बुधवारी रात्री उशिरा धाडी टाकण्यात आल्या. पडघा लगत असलेल्या बोरीवली गावातील अनेक घरांमध्ये तपास पथके दाखल झाली असून रात्रभर झडती घेण्यात आली.
साकीब नाचनच्या अटकेनंतर कारवाईला वेग
काही दिवसांपूर्वी साकीब नाचन याला एटीएसने अटक केल्यानंतर या कारवाईला अधिक वेग आला आहे. साकीब नाचन हा भिवंडी जवळील बोरीवली गावचा रहिवासी होता. एटीएसने केलेल्या तपासानुसार, साकीब हा स्लिपर सेल बनवण्यात आणि तरुणांची माथी भडकवण्यात पटाईत होता.
‘अल शाम’ नावाचा स्वतंत्र देश
मिळालेल्या माहितीनुसार, साकीब नाचन याने बोरीवली हे गाव 'वेगळा देश' म्हणून घोषित केला होता. या गावाला त्याने ‘अल शाम’ असं नाव दिलं होतं. इतकेच नव्हे, तर या 'अल शाम'साठी साकीबने स्वतःची स्वतंत्र राज्यघटना आणि स्वतंत्र मंत्रिमंडळ देखील तयार केलं होतं.






