मोहित सोमण: थोड्याच वेळात युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीबाबत घोषणा होत असताना बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाली आहे. सेन्सेक्स १०९.४५ अंकाने व निफ्टी २६.९५ अंकाने उसळला आहे. प्रामुख्याने बँक निर्देशांकाने कालच्या रिकव्हरीनंतर आजचा बुलिश ट्रेंड कायम राखल्याने बाजारात हिरवा कंदील दिला आहे. मिडकॅपने व लार्जकॅप शेअर्समध्ये वाढ झालेली असली तरी स्मॉलकॅप शेअर्समध्ये वाढ झालेली नाही. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ मिडिया (०.६८%), मेटल (०.३१%), रिअल्टी (०.४१%), तेल व गॅस (०.२५%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण कंज्यूमर ड्युरेबल्स (०.२५%), पीएसयु बँक (०.२०%), मिड स्मॉल हेल्थकेअर (०.११%) समभागात झाली आहे. निफ्टी व्यापक निर्देशांकात सकाळी सर्वाधिक वाढ मायक्रोकॅप २५० (०.१३%), निफ्टी १०० (०.१२%), निफ्टी २०० (०.११%) निर्देशांकात झाली आहे.
विशेषतः बँक निर्देशांकात आज वाढ झाली असली तरी फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीच्या आशावादावर सावधगिरी बाळगली जात असताना प्राईज करेक्शन होत असल्याने पीएसयु बँक शेअर्समध्ये घसरण होत असून प्रायव्हेट बँकेच्या शेअर्समध्ये वाढ मात्र कायम आहे. दुसरीकडे अस्थिरता निर्देशांक आज सकाळच्या सत्रात अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) केवळ ०.३४% असल्याने आज अस्थिरतेचा धोकाही मर्यादित पातळीवर दिसत आहे. आज दिवसभरात फेड व्याजदरात कपातीविषयी निकाल येऊ शकतो ज्याचा तुलनात्मकदृष्ट्या परिणाम शेअर बाजारात अपेक्षित आहे. दुसरीकडे चीनच्या ग्राहक महागाईत दोन वर्षांच्या सर्वाधिक पातळीवर (All time High) वाढ झाल्याने आशियाई बाजारातील संमिश्र प्रतिसाद अपेक्षित आहे. आज जर युएस बाजारात दर कपात झाली तरी ती सलग तिसऱ्यांदा कपात असू शकेल ज्यामुळे व्याजदर ३.५० ते ३.७५% पातळीवर येऊ शकेल ज्याचा फायदा बाजारात दिसू शकतो.
दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्थेतही मजबूत फंडामेंटलमुळे बाजारात तेजीचा अंडरकरंट असला तरी बाजारात कंसोलिडेशनची सुरूवात झाल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात प्राईज करेक्शन होऊन या आठवड्यात बाजारात घसरणही अपेक्षित आहे. काल युएस बाजारात सकारात्मकता कायम असल्याने डाऊ जोन्स (०.०५%), नासडाक (०.०९%) मर्यादित तेजीसह बंद झाले असून केवळ एस अँड पी ५०० (०.११%) घसरण झाली. आज आशियाई बाजारात गिफ्ट निफ्टी (०.२६%), तैवान वेटेड (०.६३%), कोसपी (०.२९%), जकार्ता कंपोझिट (०.४५%) बाजारात वाढ झाली असून निकेयी २२५ (०.२२%), स्ट्रेट टाईम्स (०.३२%), हेंगसेंग (०.६३%) निर्देशांकात घसरण झाली आहे.
सकाळच्या सत्रात हेवी वेट शेअरमध्ये एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी एंटरप्राईजेस, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक या शेअर्समध्ये वाढ झाली असून सर्वाधिक घसरण बीएसई, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स, बजाज ऑटो, डीसीएम श्रीराम या सारख्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.
आजच्या सुरूवातीच्या कलात वालोर इस्टेट, ज्योती सीएनसी ऑटो, एमएमटीसी, बलरामपूर चिनी, एनएचपीसी, हिंदुस्थान झिंक, अनंत राज समभागात वाढ झाली असून सर्वाधिक घसरण ईरीस लाईफसायन्स, वन ९७, इंटरग्लोब एव्हिऐशन, कायनेस टेक, टाटा टेलिकम्युनिकेशन,लेंटट व्ह्यू, त्रिवेणी टर्बाइन, किर्लोस्कर ब्रदर्स या समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील सुरूवातीच्या परिस्थितीवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,' वर्ष हळूहळू संपत असताना बाजार रचना आव्हानात्मक होत चालली आहे. व्यापक बाजारपेठेत मोठी विक्री योग्य आहे कारण केवळ तरलतेच्या बळावर मूल्यांकने वाढवली गेली आहेत आणि ती उच्च ठेवण्यात आली आहेत. हे टिकाऊ नाही. परंतु एकूण बाजारपेठेतील कमकुवतपणा आणि एफआयआयकडून सतत विक्री थोडी निराशाजनक आहे. अमेरिका-भारत व्यापार कराराच्या अंतिम टप्प्यात जास्त विलंब ही एक प्रमुख चिंता आहे. अमेरिकेत तांदूळ टाकल्याबद्दल भारतावर कारवाई करावी अशी काल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेली टिप्पणी भावनांना आणखी दुखावते.
मूलभूत गोष्टी भारताच्या बाजूने वळत आहेत. येणाऱ्या तिमाहीत उच्च वाढ आणि कॉर्पोरेट कमाई साध्य करता येईल. या वर्षी देण्यात आलेल्या वित्तीय आणि आर्थिक प्रोत्साहनामुळे परिणाम मिळू लागले आहेत. नाममात्र जीडीपी वाढीवर परिणाम करणारा अत्यंत कमी चलनवाढीचा दर येत्या तिमाहीत देखील वाढू लागेल. हे महत्त्वपूर्ण आहे कारण कॉर्पोरेट कमाईचा विकास वास्तविक जीडीपी वाढीपेक्षा नाममात्र जीडीपी वाढीने अधिक प्रभावित होईल. लार्जकॅप सेगमेंटमधील मूल्यांकने निष्पक्ष झाली आहेत ही आणखी एक सकारात्मक बाब आहे. हे सकारात्मक घटक लवकरच बाजारावर वजन करू लागतील. गुंतवणूकदारांना विश्वास ठेवावा लागेल आणि मूलभूत गोष्टी स्पष्ट होण्याची धीराने वाट पहावी लागेल.'






