Wednesday, December 10, 2025

आज अखेर स्विगीकडून १०००० कोटीची क्यूआयपी ऑफर बाजारात सुरू, कंपनीचा शेअर ३% इंट्राडे उच्चांकावर

आज अखेर स्विगीकडून १०००० कोटीची क्यूआयपी ऑफर बाजारात सुरू, कंपनीचा शेअर ३% इंट्राडे उच्चांकावर

मोहित सोमण:अखेर स्विगीकडून आपल्या गुंतवणूकीत वाढ करण्यासाठी १०००० कोटीची क्यूआयपी (Qualified Institutional Placement QIP) बाजारात खुली केली आहे. ३९०.५१ रूपये प्रति शेअरसह ही ऑफर गुंतवणूकदारांना देण्यात आली आहे. सेबी आसीडीआर (SEBI ICDR) नियमावलीना मान्य असलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार ही आकारणी केल्याचे कंपनीने स्पष्ट केले. कंपनीच्या मते या किंमतीतही ५% फ्लोअर प्राईज डिस्काउंट दिला जाऊ शकतो अद्याप यावर कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही. परंतु या लाँच दरम्यान कंपनीचा शेअर जवळपास ३% इंट्राडे उच्चांकावर पोहोचला होता.

कंपनीच्या प्राथमिक प्लेसमेंट दस्तऐवजानुसार, कोटक इन्व्हेस्टमेंट बँकिंग, जेपी मॉर्गन इंडिया आणि सिटीग्रुप ग्लोबल मार्केट इंडिया कंपनीच्या क्यूआयपीचे व्यवस्थापन करणार आहेत. कंपनीचा क्यूआयपी इश्यू केवळ खाजगी वाटप बेसिसवर असणार आहे. तो किरकोळ गुंतवणूकदारांसाठी नसून तो केवळ पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी उपलब्ध आहे. ही गुंतवणूक एक्सचेंज माध्यमातून सार्वजनिक पद्धतीने स्विकारली जाणार नाही असे कंपनीने म्हटले आहे.

कंपनी आपल्या इ कॉमर्स इकोसिस्टिम मजबूत करून पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक होती. त्यामुळे विशेषतः डार्कस्टोअर्स आणि वेअरहाऊससह तिच्या क्विक कॉमर्स विस्तारासाठी आवश्यक असणारा ४४७५ कोटी रुपयांचा भांडवल निधी क्यूआयपीतून कंपनी उभी करणार आहे. दस्तावेजाप्रमाणे त्यात असेही म्हटले आहे की २३४० कोटी रुपये तिच्या ब्रँड मार्केटिंग आणि प्रमोशनसाठी गुंतवले जातील आणि ९८५ कोटी रुपये क्लाउड स्ट्रक्चरमध्ये गुंतवणुकीसाठी वापरले जातील. उपलब्ध माहितीनुसार, एकूण उभारलेल्या भांडवलांपैकी, काही रक्कम सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी देखील वापरली जाईल जी तिच्या प्राथमिक प्लेसमेंट दस्तऐवजात उघड केलेली नाही.

निधीचा वापर तिच्या क्यूआयपी इश्यूनुसार तिच्या इक्विटी शेअर्सच्या प्रसिद्ध केलेल्या तारखेपासून तीन वर्षांच्या आत केला जाईल. आर्थिक परिस्थिती पाहता स्विगीने आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या तिमाहीत स्विगीने इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १०९२ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला आहे. तसेच कंपनीचा कामकाजातून मिळणारा महसूलात (Revenue from Operations) ५५६१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे जो मागील वर्षाच्या तुलनेत ५४% जास्त आहे .तर ईबीटातहु ७८९ कोटी रुपयांचा तोटा कंपनीने नोंदवला आहे. असे असताना कंपनी आपल्या तोटा मर्यादित करण्यासाठी अथवा नफ्यात बदलण्यासाठी आपल्या क्विक कॉमर्स व्यासपीठावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत ज्यामध्ये भांडवली गुंतवणूकीची सध्या गरज आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये १.४७% वाढ झाल्याने प्रति शेअर ४०३.९० रूपयांवर व्यवहार करत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >