Wednesday, December 10, 2025

Silver Rate Today: चांदी २ लाख प्रति किलो जवळ पोहोचली युएस फेड निर्णयापूर्वी एक दिवसात चांदीत ९००० रूपयांनी विक्रमी वाढ

Silver Rate Today: चांदी २ लाख प्रति किलो जवळ पोहोचली युएस फेड निर्णयापूर्वी एक दिवसात चांदीत ९००० रूपयांनी विक्रमी वाढ

मोहित सोमण: फेडरल रिझर्व्ह आज व्याजदरात कपातीची अपेक्षा व्यक्त केली जात असताना चांदीच्या गुंतवणूक लक्षणीय वाढ झाल्याने चांदी आज नव्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचली आहे. एकाच दिवसात चांदीच्या फ्युचर दरात १९१८०० रूपये पातळीवर पोहोचले असून प्रति किलो चांदीत एक दिवसात ९००० रूपयांनी वाढ झाल्याने भारतीय बाजारात सोने १९९००० रूपयांवर म्हणजेच २००००० लाख पातळीजवळ पोहोचले आहे. 'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात ९ रूपये वाढ झाली असून प्रति ग्रॅम दर १९९ रूपये,व प्रति किलो दर ९००० रूपयांनी वाढल्याने १९९००० रूपयांवर पोहोचला आहे.

काल चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असताना दुसऱ्या दिवशीही तेजी दिसून आली आहे आणि चांदीत मार्चमध्ये फ्युचर करारात ३७३६ रुपये किंवा १.९८% वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे आज सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange MCX) १९१८०० रुपये प्रति किलो या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. पुरवठ्यातील अडचणींमुळे मागील सत्रात या धातूमध्ये ६९२३ रुपये किंवा ३.८८% वाढ कालच्या सत्रात झाली होती व १८८६६५ रुपये प्रति किलोचा विक्रम एमसीएक्समध्ये नोंदवला होता.

जागतिक बाजारात दुपारपर्यंत ०.९८% वाढ सिल्वर फ्युचर निर्देशांकात झाली आहे. जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात ईटीएफ गुंतवणूकीत वाढ झाल्याने तसेच फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची अपेक्षा व्यक्त केली जात असल्याने गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात चांदीत गुंतवणूक वाढवली. त्यामुळे एका दिवसात चांदीच्या दरात ३.५६% वाढ झाल्याचे दिसून आले होते. या विपरित फेब्रुवारी डिलिव्हरीसाठी सोन्याचा वायदा केवळ १७३ रुपये किंवा ०.१३ % वाढून १३०२८० रुपये प्रति १० ग्रॅम जागतिक बाजारपेठेत झाला आहे.

मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीच्या प्रति ग्रॅम दर गुड रिटर्न्स संकेतस्थळावरील माहितीनुसार, १० ग्रॅमसाठी १९९० रूपयांवर, प्रति किलो दर १९९००० रूपयांवर पोहोचले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >