Wednesday, December 10, 2025

कोल्हापूरमध्ये पाच गाड्या एकमेकांवर आदळल्या, पण...

कोल्हापूरमध्ये पाच गाड्या एकमेकांवर आदळल्या, पण...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात मंगळवारी रात्री विचित्र अपघात घडला. तब्बल पाच ते सहा गाड्यांच्या अपघाताने कोल्हापूरकरांच्या काळजाचा ठोका चुकला. सुदैवाची गोष्ट म्हणजे २० ते २५ लोकांपैकी कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही, जीवितहानी सुद्धा झाली नाही.

शहरातील केएसबीपी चौकातून सायबर चौकाकडे येणाऱ्या ऊसाच्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रक दुभाजकाला धडकला. ट्रॅफिक सिग्नलला थांबलेल्या चार कार सोबतच एका टेम्पोला ट्रकने धडक दिली. त्यानंतर याच ट्रकने एका बसला अलगद ठोकर दिली. अपघातात ट्रक चालकासह कार आणि टेम्पोतील चौघे किरकोळ जखमी झाले. बसमध्ये जवळपास २० ते २५ माणसे होती. सुदैवाने यातील कुणालाही गंभीर जखम झालेली नाही.

अपघातात ट्रकखाली कार सापडून ती पूर्णपणे नाहीशी झाली .कारमधील सुनील रेडेकर हे थोडक्यात बचावले. त्यांना दुचाकीवरील दोन तरुणांनी तातडीने कारच्या काचा फोडून बाहेर काढले. राजारामपुरी पोलिस आणि शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जखमींना तातडीने बाहेर काढले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >