Tuesday, December 9, 2025

आता आधार कार्डची झेरॉक्स बंद!

आता आधार कार्डची झेरॉक्स बंद!

फक्त डिजिटल पडताळणीसाठी अनिवार्य

मुंबई : सरकारने आधार कार्ड संदर्भात मोठा निर्णय घेतला असून लवकरच नवीन नियम लागू होणार आहेत. या नियमानुसार, हॉटेल्स, कार्यक्रम स्थळे आणि इतर संस्थांमध्ये आधार कार्डच्या फोटोकॉपी घेणे किंवा जतन करणे पूर्णपणे बंद केले जाईल. सरकारच्या मते, कागदावर आधारित आधार पडताळणी केवळ बेकायदेशीर नसून गोपनीयतेला मोठा धोका निर्माण करते. यासाठी युनीक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (युआयडीएआय) ने नवीन मार्गदर्शक तत्त्वे मंजूर केली आहेत. आता कोणतीही संस्था ऑफलाइन आधार पडताळणी करू इच्छित असल्यास प्रथम युआयडीएआयकडे नोंदणी करावी लागेल. युआयडीएआयचे सीईओ भुवनेश कुमार यांनी सांगितले की, नवीन नियमांनुसार हॉटेल्स, आयोजक आणि इतर संस्थांना युआयडीएआयकडे नोंदणी करून सुरक्षित एपीआय द्वारे डिजिटल पद्धतीने आधार पडताळणी करता येईल.

Comments
Add Comment