Tuesday, December 9, 2025

मुंबईत शुक्रवारी आणि शनिवारी राहणार या भागात पाणीकपात

मुंबईत शुक्रवारी आणि शनिवारी राहणार या भागात पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विलेपार्ले अंधेरी पूर्व भाग (के पूर्व विभाग), वांद्रे पूर्व भाग(एच पूर्व विभाग )तसेच धारावी या (जी उत्तर )विभागातील मोठ्या आकाराच्या जलवाहिनी जोडणीची कामे हाती घेतली जाणार आहेत. ही कार्यवाही शुक्रवार, १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता सुरू होईल. हे काम शनिवारी १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत पूर्ण अपेक्षित आहे. एकूण २४ तास सुरु राहणार आहे. परिणामी, या के पूर्व, एच पूर्व व जी उत्तर विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर के पूर्व विभागात काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

महापालिकेच्या के पूर्व, एच पूर्व व जी उत्तर विभागातील विविध ठिकाणची १८०० मिलीमीटर व्यासाची तानसा पश्चिम जलवाहिनी, १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी, २४०० मिलीमीटर व्यासाची वैतरणा जलवाहिनी आणि जी उत्तर विभागातील १५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडणीचे काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. ही कामे शुक्रवार, १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपासून शनिवार, दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत एकूण २४ तास सुरु राहणार आहे.

के पूर्व, एच पूर्व व जी उत्तर विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून - गाळून प्‍यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

कोणत्या भागात राहणार पाणीकपात

. ‘जी उत्तर’ विभाग :(धारावी सकाळचा पाणीपुरवठा) - धारावी लूप मार्ग, ए. के. जी. नगर धारावी सायंकाळचा पाणीपुरवठा - धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदीर मार्ग, दिलीप कदम मार्ग, जस्मिन मील मार्ग, माहीम फाटक, ए. के. जी. नगर (शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी पाणीपुरवठा बंद)

धारावी सकाळचा पाणीपुरवठा - जस्मिन मील मार्ग, माटुंगा कामगार वसाहत, संत रोहिदास मार्ग, ६० फूट मार्ग, ९० फूट मार्ग, संत कक्कैया मार्ग, एम. पी. नगर धोरवडा, महात्मा गांधी मार्ग (शनिवार, दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी पाणीपुरवठा बंद)

‘के पूर्व’ विभाग* : विजय नगर मरोळ, मिलीट्री रोड, वसंत ओॲसिस, गावदेवी, मरोळ गाव, चर्च रस्ता, हिल व्ह्यू सोसायटी, कदमवाडी, भंडारवाडा, उत्तम ढाबा.

आंतरराष्ट्रीय विमानतळ व सिप्झ

मुलगाव डोंगरी, एम. आय. डी. सी. मार्ग क्रमांक १ ते २३, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडिविटा, महेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गापाडा, मामा गॅरेज

चकाला, प्रकाशवाडी, गोविंदवाडी, मालपा डोंगरी क्रमांक १ व २, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजीनगर, शहीद भगतसिंग वसाहत (भाग), चरतसिंग वसाहत (भाग), मुकुंद रुग्णालय, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, इंदिरा नगर, मापखान नगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग क्षेत्र, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक क्षेत्र, रामकृष्ण मंदिर मार्ग, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, कांतीनगर कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍन्ड टी वसाहत (शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी पाणीपुरवठा बंद)

....................................................................................................

कोलडोंगरी, जुनी पोलीस गल्ली, विजय नगर (सहार रस्ता) मोगरपाडा (शुक्रवार दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा)

ओमनगर, कांतीनगर, राजस्थान वसाहत, साईनगर (तांत्रिकक्षेत्र) सहारगाव, सुतारपाखडी (पाईपलाईनक्षेत्र) (शनिवार, दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी पाणीपुरवठा बंद)*

‘एच पूर्व’ विभाग : संपूर्ण वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) विभाग, मोतिलाल नगरसह (शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी पाणीपुरवठा बंद)*

प्रभात वसाहत, टिस-३, आग्रीपाडा, कालीन, सीएसटी मार्ग हंसबुरगा मार्ग, विद्यापीठ , CST सीएसटी मार्गाची दक्षिण बाजू, यशवंत नगर, सुंदर नगर, कोळीवरी गाव तीन बंगला, शांतिलाल कंपाऊंड, पटेल कंपाऊंड, गोळीबार मार्ग, खार भुयारी मार्ग (सब वे) ते खेरवाडी खेरवाडी, नवापाडा, बेहराम नगर, ए. के. मार्ग, शासकीय वसाहत वांद्रे (पूर्व) (शनिवार, दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी पाणीपुरवठा बंद)

Comments
Add Comment