मोहित सोमण: आज सुरुवातीच्या सत्रात शेअर बाजारात घसरणीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पहाटेही गिफ्ट निफ्टी मोठ्या प्रमाणात घसरलेला होता. प्री ओपन सत्रात सेन्सेक्स २९० अंकांने व निफ्टी ९४ अंकांने घसरला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकातही घसरण कायम आहे. सर्वाधिक घसरण बँक, प्रायव्हेट बँक, फायनांशियल सर्विसेस, आयटी, ऑटो या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण प्री ओपन सत्रात झालेली दिसत आहे. व्यापक निर्देशांकात सर्वाधिक घसरण मायक्रोकॅप २५० (०.४५%), निफ्टी ५०० (०.३४%), निफ्टी १०० (०.३६%) निर्देशांकात झाली.
शेअर बाजारातील दुसरा अंक सुरू होण्याची शक्यता उद्यापासून असताना आज मात्र बाजारात अपेक्षित घसरण कायम राहील का हे अखेरच्या सत्रात कळेलच तत्पूर्वी बाजारातील भूराजकीय अस्थिरतेचा परिणाम बाजारात दिसू शकतो. काल झालेल्या मोठ्या शेअर बाजारातील घसरणीमुळे निफ्टी २६००० आकडा राखण्यातही अयशस्वी ठरला कारण बाजारात मोठ्या प्रमाणात जवळपास ७.५ लाख कोटींच्या शेअरचे बाजारात सेल ऑफ झाले होते. आज बाजारात कंसोलिडेशनची फेज कायम राहून बाजारात पुन्हा रूपया आणखी घसरल्याने परदेशी गुंतवणूकदार आपली विक्री कायम राखतील का उद्याच्या युएस फेड दर कपातीचा ट्रिगर बाजारात तेजी निर्माण करेल याकडे गुंतवणूकदारांचे बारकाईने लक्ष असणार आहे. काल ४ ते ६% उसळलेला अस्थिरता निर्देशांक आज ८.११% उसळल्याने शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढउतार अपेक्षित आहे. किंबहुना बाजारातील बँक निर्देशाक एकूण इक्विटी बेंचमार्क निर्देशांकातील कामगिरी सुनिश्चित करतील. सकाळी आशियाई बाजारात संमिश्र प्रतिसाद मिळाला असताना निकेयी ०.२०%, स्ट्रेट टाईम्स (०.२०%) सेट कंपोझिट (०.५७%) निर्देशांकात वाढ झाली असून सर्वाधिक घसरण हेंगसेंग (०.८२%), कोसपी (०.७७%), तैवान वेटेड (०.३९%) निर्देशांकात झाली. विशेषतः काल युएसने एनविडिया चीपसेट कंपनीला चीनसह ठराविक ग्राहकांना चिपची विक्री करण्याची परवानगी दिली असून त्याबदल्यात अमेरिकन सरकारला त्या विक्रीतून २५% हिस्सा देण्याचे कंपनीने मान्य केल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल नेटवर्कर स्पष्ट केले आहे. तरीही काल शेअर बाजारात तुलनात्मकदृष्ट्या घसरले आहे व तज्ज्ञांच्या मते १० वर्षाच्या ट्रेझरीयील्ड मध्ये घसरणीची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे युएस बाजारात डाऊ जोन्स (०.०५%) वगळता इतर दोन एस अँड पी ५०० (०.३५%), नासडाक (०.२५%) निर्देशांकात घसरण झाली.
आज प्री ओपन सत्रात सर्वाधिक वाढ इंटलेक्ट डिझाईन (३.६६%), टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (३.२९%), न्यूलँड लॅब्स (३.२४%), जिलेट इंडिया (२.५५%) फिनोलेक्स केबल्स (२.०६%), सीएट (१.७५%), एबी लाईफस्टाईल (१.५६%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण इंटरग्लोब एव्हिऐशन (४.९९%), झेंसार टेक्नॉलॉजी (३.६६%), एलटी फूडस (.३.४४%), एलटी फूडस (३.४३%), निवा बुपा हेल्थ (३.४४%) गोदावरी पॉवर (२.६३%), विशाल मेगामार्ट (२.५६%), आदित्य एएमसी (२.१३%), कजारिया सिरॅमिक (२.०९%) समभागात झाली आहे.
बाजार पूर्व परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,' बाजार अलिकडच्या उच्चांकी पातळीवर टिकून राहू शकला नाही आणि तेजीसाठी नवीन ट्रिगर्सचा अभाव यामुळे गुंतवणूकदारांमध्ये एक प्रकारचा थकवा निर्माण झाला आहे. बहुतेक किरकोळ गुंतवणूकदारांनी काही लार्ज कॅप्सच्या वर्चस्व असलेल्या या अरुंद तेजीत भाग घेतला नाही, यामुळे किरकोळ निराशा अधिकच वाढली आहे. निफ्टीने नवीन विक्रम प्रस्थापित केला तरीही, एनएसई ५०० मधील ३२० शेअर्स त्यांच्या शिखरांपेक्षा खाली व्यवहार करत होते आणि मिड आणि स्मॉल कॅप्सच्या वर्चस्व असलेल्या पोर्टफोलिओ असलेल्या किरकोळ गुंतवणूकदारांना नाराजी होती. परिणामी, मिड आणि स्मॉल कॅप्समध्ये आणखी विक्री होत असल्याने त्यांच्या किमती खाली येत आहेत, तर या तेजीचे नेतृत्व करणारे मजबूत लार्ज कॅप्स लवचिक राहिले आहेत. थोडक्यात, आपण आता जे पाहत आहोत ते म्हणजे बाजारावर प्रभाव पाडणारे मूलभूत घटक. मिड आणि स्मॉल कॅपजर २५८४२ हा अंक अबाधित राहिला तरच तो पुन्हा सावरेल असे दिसून येईल. २६००० हा अंक काढून टाकला तरच अशा चढउतारांना बळकटी मिळू शकते. दरम्यान, २५८४२ पातळीच्या खाली घसरण झाल्यास कमीत कमी २५६५० पातळीपर्यंत तोटा दिसून येईल. सेगमेंटमधील ओव्हरव्हॅल्युएड स्टॉक डंप होत आहेत ज्यामुळे त्यांच्या शेअर्सच्या किमतींवर परिणाम होत आहे. हा ट्रेंड दिसण्यासाठी अजून काही वेळ आहे. मिड कॅप्समध्ये पुढील सुधारणा दीर्घकालीन गुंतवणूकदारांना या सेगमेंटमध्ये हळूहळू उच्च दर्जाचे वाढीचे स्टॉक जमा करण्याची संधी उघडतील. संरक्षण स्टॉक आता मूल्य देतात.'
आजच्या बाजारातील टेक्निकल पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,'जर २५८४२ हा अंक अबाधित राहिला तरच तो पुन्हा सावरेल असे दिसून येईल. २६००० हा अंक काढून टाकला तरच अशा चढउतारांना बळकटी मिळू शकते. दरम्यान, २५८४२ च्या खाली घसरण झाल्यास कमीत कमी २५६५० पर्यंत तोटा दिसून येईल.






