Tuesday, December 9, 2025

स्टारलिंककडून अद्याप कुठलीही किंमत जाहीर नाही. प्रसिद्ध झालेल्या किंमती चुकीच्या- स्टारलिंक

स्टारलिंककडून अद्याप कुठलीही किंमत जाहीर नाही. प्रसिद्ध झालेल्या किंमती चुकीच्या- स्टारलिंक

नवी दिल्ली: एलोन मस्क यांच्या स्टारलिंकने अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवल्यानंतर त्यांच्या इंटरनेट सेवेच्या किंमती कालपासून झळकत होत्या. मात्र ती चूकीची माहिती असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. स्टारलिंक बिझनेस ऑपरेशन्सच्या उपाध्यक्ष लॉरेन ड्रेयर यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर लिहित, कॉन्फिगरेशनमधील एका त्रुटीमुळे त्यांच्या भारतातील वेबसाइटवर डमी चाचणी डेटा थोडक्यात दिसू लागला आणि ही समस्या सोडवण्यात आली आहे. भारतातील इंटरनेटचे पॅकेज प्लान अद्याप कंपनीने ठरविले नसल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वी प्रसारमाध्यमांनी स्टारलिंकच्या संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे इंटरनेट सेवेच्या किंमती प्रकाशित केल्या होत्या.

संकेतस्थळावरील किंमती पाहता त्यात स्टारलिंक सबस्क्रिप्शन प्लॅनची सुरुवातीची किंमत ८६०० रुपये असल्याचे दिसून आले होते तर ग्राहकांना हार्डवेअर रिटेल बॉक्ससाठी ३४००० रुपये मोजावे लागणार होते. भारतासारख्या किमतीच्या बाबतीत जागरूक बाजारपेठेसाठी हा टॅरिफ प्लॅन महागडा असल्याचे अनेकांना वाटले होते मात्र या किंमतीत तथ्य नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. अद्याप चाचणी पूर्ण न झाल्याने यांची किंमत निश्चित झाली नसल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. सुधारित किंमती येणाऱ्या दिवसात कंपनी स्पष्ट करेल पण तत्पूर्वी तांत्रिक अडचणींमुळे जुन्या किंमती संकेतस्थळावर प्रदर्शित झाल्या आहेत असे कंपनीने स्पष्ट केले.

जगभर टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झालेल्या स्टारलिंक्ला भारतातही स्पर्धेचा निश्चित सामना करावा लागेल. पण जगभरात क्रेझ निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध असलेले स्टारलिंक कमी आकाराचे लो लेंटंसी डिव्हाईस असते ज्यामुळे परवडणाऱ्या किमतीत हायस्पीड इंटरनेटचा उपभोग घेणे ग्राहकांना शक्य होते. सध्या स्टारलिंक जगभरातील १५० देशांना आपली सुविधा पुरवतो. यापूर्वी भारत सरकारने स्टारलिंकला परवाना दिलेला असला तरी अद्याप सेवेला सुरूवात झालेली नाही कारण भारताच्या दूरसंचार विभागाने (DoT) स्टारलिंकला व्यावसायिक उपग्रह ब्रॉडबँड सेवा चालविण्यासाठी पाच वर्षांचा परवाना दिला असला तरी लाँच करण्यापूर्वी त्यांना पुढील अनुपालन मंजुरी (Regulatory Compliance) आवश्यक आहेत.

स्टारलिंक अशा दुर्गम भागांना लक्ष्य करणार आहे जिथे पारंपारिक ब्रॉडबँड पायाभूत सुविधा अगदीच मर्यादित आहेत. मर्यादित आहेत, हवामान प्रतिरोधक अशी विश्वसनीय सेवा स्टारलिंक पुरवणार आहे. स्टारलिंकने प्रमुख भारतीय दूरसंचार ऑपरेटर, भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ सोबत किरकोळ भागीदारी केली आहे. त्यांच्या नेटवर्कचा वापर करत व नेटवर्क वाढवून विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात सेवा कंपनी देणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा