Tuesday, December 9, 2025

शेअर बाजारात 'सेल ऑफ' ची धुलाई सलग दुसऱ्यांदा बाजार घसरल्याने 'या' कारणांवर चिंता कायम सेन्सेक्स ४३६.४१ व निफ्टी १२०.९० अंकांने कोसळला

शेअर बाजारात 'सेल ऑफ' ची धुलाई सलग दुसऱ्यांदा बाजार घसरल्याने 'या' कारणांवर चिंता कायम सेन्सेक्स ४३६.४१ व निफ्टी १२०.९० अंकांने कोसळला

मोहित सोमण: सलग दुसऱ्यांदा शेअर बाजारात घसरण झाली आहे. गुंतवणूकदारांनी आजही सेल ऑफ वाढवल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात 'धुलाई' झाली व निर्देशांकात वाढ होण्याची संधी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारसह घरगुती गुंतवणूकदारांनी दिली नाही. सेन्सेक्स ४३६.४१ अंकाने वाढत ८४६६६.२८ पातळीवर व निफ्टी १२०.९० अंकाने घसरत २५८३९.६५ पातळीवर स्थिरावला आहे. बँक निर्देशांकातही आज घसरण झाली असली तरी सकाळच्या मानाने फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची आशा निर्माण झाल्याने १२० अंकांने रिकव्हरी केली आहे. मात्र सपोर्ट लेवल मिळण्यास हा निर्देशांक अयशस्वी ठरला आहे. मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्येही घसरण कायम राहिली असून निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील सर्वाधिक घसरण आज आयटीत (१.१९%) कायम राहिली असून सर्वाधिक वाढ मात्र पीएसयु बँक (१.२९%), रिअल्टी (०.९५%), मिडिया (०.७०%) निर्देशांकात झाली.

उद्या युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील कपात अपेक्षित असल्याने गुंतवणूकदारांनी बँक वगळता इतर निर्देशांकात मोठी सावधगिरी बाळगली जयाचक फटका आजही बाजारात कायम राहिला. दुसरीकडे रूपयात काही प्रमाणात अखेरच्या सत्रात रिबाऊंड झाले असले तरी डॉलरच्या तुलनेत रूपयात सातत्याने घसरत असल्याने मोठ्या प्रमाणात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेतल्याची शक्यता आहे. कमोडिटी बाजार आजही अस्थिर राहिला. दरम्यान भूराजकीय अस्थिरतेसह विकली एक्सपायरीचा फटका बाजारात बसला. एकूणच बाजाराने आज मोठ्या प्रमाणात नफा बुकिंग केल्याचेही चित्र नाकारता येत नाही.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडून तांदळाच्या आयातीवर आणि कॅनडातून खतांच्या आयातीवर नवीन शुल्क आकारण्याची शक्यता दर्शविल्यानंतर गुंतवणूकदारांच्या भावना आणखी वाढल्या. व्हाईट हाऊसच्या अधिवेशनात अमेरिकन शेतकऱ्यांसाठी अब्जावधी डॉलर्सच्या मदत पॅकेजचे अनावरण करताना हे वक्तव्य आले.

अखेरच्या सत्रात आशियाई बाजारात गिफ्ट निफ्टी (०.३९%) सहित बहुतांश निर्देशांकात घसरण झाली आहे ज्यामध्ये सर्वाधिक घसरण हेंगसेंग (१.४८%), तैवान वेटेड (०.४३%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक वाढ सेट कंपोझिट (०.६७%) निर्देशांकात झाली आहे. युएस बाजारातही सुरूवातीच्या कलात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ टाटा टेलिकम्युनिकेशन (१७.७९%),केईंस टेक (१३.१६%), एरिस लाईफ सायन्स (१०.९१%), नावा (८.००%), त्रिवेणी इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज (८.००%), जीई व्हर्नोवा (५.६४%) समभागात वाढ झाली आहे तर सर्वाधिक घसरण इ क्लर्क सर्विसेस (५.४९%), एशियन पेंटस (४.५२%), एशर एनर्जी (४.४३%), आयटीसी (३.१३%), बीएसई (२.९७%), बलरामपूर चिनी (२.९६%), हिरो मोटोकॉर्प (२.६९%) समभागात झाली आहे.

आजच्या रूपयातील हालचालींवर भाष्य करताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ रिसर्च विश्लेषक दिलीप परमार म्हणाले आहेत की,'भारतीय रुपयाने लक्षणीय सुधारणा दर्शविली आहे, दोन दिवसांच्या घसरणीला यशस्वीरित्या मागे टाकत तो आशियाई चलनांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा चलन म्हणून उदयास आला आहे. डॉलरच्या दीर्घकालीन चलनांच्या पुनर्बांधणीमुळे ही वाढ झाली. जागतिक कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे आणि प्रादेशिक चलनांच्या मजबूतीमुळे रुपयाला आणखी आधार मिळाला.

तथापि, या सवलतीनंतरही, रुपया अद्याप संकटातून बाहेर पडलेला नाही, कारण मूलभूत असंतुलन कायम आहे कारण डॉलरची मागणी त्याच्या उपलब्ध पुरवठ्यापेक्षा जास्त आहे. तांत्रिकदृष्ट्या, स्पॉट युएसडी ९०.३० वर एक महत्त्वपूर्ण प्रतिकार पातळीचा सामना करत आहे, तर ८९.७० वर एक मजबूत आधार आधार शोधत आहे.'

Comments
Add Comment