Tuesday, December 9, 2025

बार्शीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राजेंद्र राऊत गटाची एक हाती सत्ता

बार्शीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राजेंद्र राऊत गटाची एक हाती सत्ता

बार्शी: बार्शी तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाने एक हाती बाजी मारली आहे. त्यामुळे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या बळीराजा विकास पॅनेलने दणदणीत विजय मिळवत विरोधकांचा सुफडा साफ केला आहे. त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाआधी बार्शीत लिटमस चाचणी झाली आणि त्यात माजी आमदार राजेंद्र राऊत हे यशस्वी झाले, अशी चर्चा सुरू आहे. या निवडणूकीत माजी आमदार राजेंद्र राऊत विरूद्ध विद्यमान आमदार दिलीप सोपल यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीमुळे बार्शीत राजकीय वातावरण तापले होते. कारण बार्शी तालुक्यातील पारंपारिक प्रतिस्पर्धी विद्यमान आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत हे बाजार समितीच्या निवडणुकीत आमने सामने आले होते. सोपल आणि राऊत या दोन्ही गटांकडून मोठ्या अटीतटीने निवडणुका लढवल्या होत्या. या निवडणुकीतील महत्त्वाची गोष्ट बाजार समितीच्या निवडणुकीत प्रथमच आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या घरातील कोणीही उमेदवार नव्हता.

बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानापूर्वीच माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या बळीराजा विकास पॅनेलचे व्यापारी मतदारसंघातील दोन उमेदवार बिनविरोध निवडले गेले होते. रविवार, ७ डिसेंबर रोजी १६ जागांसाठी चुरशीने ९६.९८ टक्के मतदान झाले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी (९ डिसेंबर) मतमोजणी करण्यात आली, ज्यात माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी सोपल गटाचा धुव्वा उडवल्याचे चित्र दिसले. दरम्यान २१ डिसेंबरला नगरपरीषदेचा निकाल लागणार आहे. त्या अगोदरच बाजार समितीच्या निवडणूकीचा निकाल लागल्याने बार्शीत लिटमस चाचणी यशस्वी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

राऊत गटाच्या बळिराजा विकास आघाडीचे विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते :

सुरेश गुंड (८१५) बाबा गायकवाड (७९०) विजय गरड (८०४) अभिजित कापसे (७९८) प्रभाकर डंबरे (८१८) रविकांत साळुंखे (७९१)

यशवंत माने (८१३)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >