Tuesday, December 9, 2025

न्याय मागणाऱ्या महिलेवर पोलिसाकडूनच अत्याचार

न्याय मागणाऱ्या महिलेवर पोलिसाकडूनच अत्याचार

आरोपी हवालदारास अटक

डहाणू : आपल्या पतीची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेशी जवळीक साधून तिच्यावर पोलिसानेच अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी संबंधित पोलीस हवालदारावर शरद भोगाडेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. या घटनेमुळे कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांची तडकाफडकी बदली केली. पोलीस निरीक्षक अमर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या महिलेने आपला पती आपल्याला सोडून एका तरुण मुलीसोबत राहत असल्याची तक्रार केली होती. पोलीस ठाण्यातील हवालदार भोगाडेने संबंधित महिलेला चौकशीसाठी बोलावून पोलिस वसाहतीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला अशी तक्रार महिलेने केली. डहाणू पोलिसांनी गुन्हा दाखल करत प्रकरण कासा पोलिसांकडे वर्ग केले. यानंतर आरोपी भोगाडे यास अटक केली.

Comments
Add Comment