मोहित सोमण: फिजिक्सवाला (Physicswallah) कंपनीच्या तिमाही निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये आज ५% पर्यंत इंट्राडे उच्चांकावर वाढ झाली आहे. प्रामुख्याने तिमाही निकालात कंपनीच्या निव्वळ नफ्यात (Net Profit) ७०% वाढ झाल्याने आज गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद शेअरला दिला आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ४१ कोटीवरुन यंदा ६९.७ कोटींवर वाढ नोंदवली. तर कंपनीच्या खर्चातही इयर ऑन इयर बेसिसवर २५% वाढ झाल्याचे कंपनीने निकालात म्हटले होते. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ८०० कोटींच्या तुलनेत यंदा ९९९.६० कोटीवर वाढ झाली आहे. तसेच कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर २६% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या ८३२.२० कोटींच्या तुलनेत या तिमाहीत १०५१.२० कोटींवर ही वाढ झाली आहे.
कंपनीने निकालादरम्यान ऑफलाईन व ऑनलाईन या दोन्ही व्यवसायात वाढ नोंदवली आहे. कंपनीच्या ग्राहक संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले जे गेल्या वर्षीच्या तुलनेतील यंदा २.९९ दशलक्षावरून ३.६२ दशलक्षवर पोहोचले. ही ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने क्लासेस घेणारी ही कंपनी असून कंपनीने आपल्या मार्जिनमध्येही सुधारणा नोंदवली आहे. नुकताच ११ ते १३ नोव्हेंबर कालावधीत कंपनीचा शेअर आयपीओतून बाजारात दाखल झाला होता. ३४८० कोटींच्या शेअरला एकूण १.९२ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते. गेल्या पाच दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये २.२२% वाढ झाली आहे तर एक महिन्याचा विचार केल्यास शेअर्समध्ये १०.२३% घसरण झाली आहे.
कंपनीने अलीकडेच ‘पाय’ व्यासपीठ लाँच केले आहे, जे कमी किमतीचे, लक्ष विचलित न करणारे शिक्षण प्लॅटफॉर्म आहे ज्याची किंमत ३०० ते ४०० रुपयांच्या दरम्यान आहे असे सांगितले जाते. या उत्पादनाचा उद्देश पारंपारिक पेड इकोसिस्टमच्या बाहेरील नवीन शिकणाऱ्या विभागांकडून कमाई करणे असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले होते. सकाळी सत्र सुरूवातीला कंपनीच्या शेअर्समध्ये ५% उसळल्याने १४५.६० या इंट्राडे उच्चांकावर शेअर पोहोचला.






