बांबूची झाडे अधिक प्रमाणात लावली जाणार
महापालिका बनवणार बांबूच्या झाडांची नर्सरी
मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने आता वायू प्रदूषण नियंत्रणासाठी तसेच पर्यावरणदृष्ट्या परिसर हरित राखण्यासाठी रस्त्याच्या कडेसह मोकळ्या जागांमध्ये बांबूची झाडे लावली जाणार आहे. मोकळ्या जागांवर अतिक्रमण होवू नये यासाठी बांबूची झाडे लावणे योग्य ठरणार असून ही बांबूची झाडे केव्हा कापता येत असल्याने अशाप्रकारची झाडे लावण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने बांबूच्या झाडांची नर्सरी तयार केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ अविनाश ढाकणे यांनी सुतोवाच केले आहे.
मुंबईतील पूर्व उपनगरातील रस्त्याच्या कडेला बांबू लावण्याचा प्रकल्प बारगळला असला तरी भविष्यात रस्त्याच्या कडेला झाडे लावण्यात आल्यानंतर कापण्यात येणारे निर्बंध लक्षात घेता बांबूची झाडे लावण्याचा विचार असल्याचे डॉ ढाकणे यांनी स्पष्ट केले. मुंबईतील अनेक मोकळ्या जागा तसेच रस्त्याच्या कडेला आता बांबूची झाडे लावण्याचा विचार आहे. त्यादृष्टीकोनातून आढावा घेतला जात आहे. मोकळ्या झाडांवर झाडे लावण्याऐवजी बांबू लावल्यास त्याची वाढ जलदगतीने होते, तसेच त्यामुळे पर्यावरणपुरक वातावरण तयार होते, शिवाय हे बांबू कधीही कापून जागा मोकळी करून देता येतात. यासाठी कोणत्याही प्रकारच्या परवानगी लागत नाही. त्यामुळे भविष्यात काही मोकळे भूखंड असल्यास तिथेही बांबू लावले जातील असे डॉ ढाकणे यांनी स्पष्ट केले.
प्रभाग क्रमांक १९२मध्ये भाजपाला सुटला तरी उमेदवारीवरून जोरदार स्पर्धा मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग ...





