नागपूरमध्ये महायुतीची महाबैठक! अंतर्गत वादांना मिळणार पूर्णविराम?

नागपूर: महायुतीत मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेला भाजप आणि शिवसेनेतील फुटीबाबत जे चित्र निर्माण झाले होते, ते आता लवकरच बदलणार आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात काल (८ डिसेंबर) रात्री उशिराने एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ज्यात महायुतीतील मुख्य नेत्यांसह इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक असल्याचे समजते.


या बैठकीत महायुतीमध्ये सुरू असलेल्या कुरघोड्या, पक्षप्रवेश, अंतर्गत धुसफूस या वादांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती आहे. जवळजवळ दीड तासाच्या चर्चेनंतर, महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका महायुती म्हणून संयुक्तपणे लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण, पक्षप्रवेश करून घेताना महायुती आणि मित्र पक्ष दुखावले जाणार नाही, याचा प्रत्येकाने विचार करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्या आहेत. त्यामुळे आता महायुतीमधील वाद आता थांबणार असल्याचा अंदाज आहे.




याप्रमाणेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनापासून ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पुढचे दोन महिने निवडणुका आहेत, काळजी घ्यावी लागेल, रोज अधिवेशनात हजेरी लावा, शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडा अशा सूचना या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेत्यांना दिल्या आहेत.

Comments
Add Comment

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘बीग्सी’ अभिनव, खर्चमुक्त उपक्रम

मुंबई : महिला प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत गृह विभाग तसेच परिवहन विभागाच्या सहकार्याने

शहीदी समागम कार्यक्रमासाठी भव्य लंगरची व्यवस्था

नांदेड : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त २४ आणि २५ जानेवारी

महाराष्ट्राच्या ले. कर्नल सीता शेळके यांना ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ जाहीर

नवी दिल्ली : आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करणाऱ्या अहिल्यानगरच्या

शेअर बाजार गुंतवणूकदार आहात? मग एकाच ट्रेडिंग अँपवर सगळ काही भारतातील पहिला डिफाइनेज सिक्युरिटीजतर्फे अल्गो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म ‘अल्गोस्ट्रा’ लाँच

मोहित सोमण: देशात सध्या मोठ्या प्रमाणात शेअर बाजार ट्रेडिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. प्रत्येकाचा विविध ग्राहक

मुंबईच्या नव्या महापौरांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे राणीबागेतला महापौर बंगला

मुंबई : मुंबई महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. मुंबई महापालिकेत भाजपा

भारत सरकारकडून सिडबीमध्ये ५००० कोटी रुपयांचे भांडवली गुंतवणूक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने, भारतातील विशाल सूक्ष्म, लघु आणि