Wednesday, December 31, 2025

IPL 2026 Auction: टॉप 5 गटात 34 खेळाडूंवर लागणार बोली

IPL 2026 Auction: टॉप 5 गटात 34 खेळाडूंवर लागणार बोली

IPL 2026 मिनी लिलावासाठी एकूण 350 खेळाडूंची नावं निश्चित करण्यात आलेली आहे . टॉप खेळाडूंसाठी पाच गट करण्यात आले आहेत. त्या 34 खेळाडूंची नावं सूचीबद्ध करण्यात आलेली असून, या खेळाडूंवर मोठी बोली लागू शकते. IPL 2026 च्या मिनी लिलावासाठी अंतिम यादी तयार आहे. यावेळी लिलावासाठी 350 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तर 1005 खेळाडूंना लिलावा आधीच बाहेर काढण्यात आले आहे . आता प्रमुख खेळाडूंसाठी पाच गट केले आहेत. पहिल्याच फेरीत त्यांच्यावर बोली लागेल.

पहिल्या गटात दिग्गज खेळाडू असणार आहेत. या गटाकडे सर्वच फ्रेंचायझींचं लक्ष वेधून आहे. हे खेळाडू मिनी लिलावात चांगल्या भावाने जाऊ शकतात. गस अ‍ॅटकिन्सन (इंग्लंड), वनिंदू हसरंगा (श्रीलंका), दीपक हुडा (भारत), वेंकटेश अय्यर (भारत), लियाम लिव्हिंगस्टोन (इंग्लंड), वियान मुल्डर (दक्षिण आफ्रिका), रचिन रवींद्र (न्यूझीलंड) हे खेळाडू प्रथम गटात आहेत.

दुसऱ्या गटात डेव्हॉन कॉनवे (न्यूझीलंड), जेक फ्रेझर-मॅकगर्क (ऑस्ट्रेलिया), कॅमरून ग्रीन (ऑस्ट्रेलिया), सरफराज खान (भारत), डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका), पृथ्वी शॉ (भारत) हे खेळाडू आहे. विशेष म्हणजे पृथ्वी शॉ आणि सरफराज खान यांना मागच्या लिलावात कोणीच घेतलं नव्हतं. त्यामुळे यावेळी त्यांच्यासाठी कोण बोली लावेल याकडे लक्ष असेल.

तिसऱ्या टप्प्यात यष्टीरक्षक खेळाडू असतील. यात फिन एलन (न्यूझीलंड), जॉनी बेअरस्टो (इंग्लंड), केएस भरत (भारत), क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका), बेन डकेट (इंग्लंड), रमनउल्लाह गुरबाज (अफगाणिस्तान), जेमी स्मिथ (इंग्लंड) यांचा समावेश आहे.

चौथ्या टप्प्यात वेगवान गोलंदाज असतील. जेराल्ड कोएत्झी (दक्षिण आफ्रिका), आकाश दीप (भारत), जेकब डफी (न्यूझीलंड), फजलहक फारुकी (अफगाणिस्तान), मॅट हेन्री (न्यूझीलंड), स्पेन्सर जॉन्सन (ऑस्ट्रेलिया), शिवम मावी (भारत), अँरिक नोकिया (दक्षिण आफ्रिका), मथीशा पाथिराना (श्रीलंका) हे खेळाडू आहेत.

पाचव्या टप्प्यात फिरकीपटूंची संच असेल. यात रवी बिश्नोई (भारत), राहुल चहर (भारत), अकील हुसेन (वेस्ट इंडिज), मुजीब उर रहमान (अफगाणिस्तान), महेश तिशाना (श्रीलंका) यांची नावं असतील.

Comments
Add Comment