Tuesday, December 9, 2025

IndiGo Share Price: आजचा दिवस इंडिगो एअरलाईन्ससाठी 'कर्दनकाळ' 'या' कारणामुळे… शेअर सलग नवव्या सत्रात कोसळला

IndiGo Share Price: आजचा दिवस इंडिगो एअरलाईन्ससाठी 'कर्दनकाळ' 'या' कारणामुळे… शेअर सलग नवव्या सत्रात कोसळला

मोहित सोमण: इंडिगोचा शेअर सलग नवव्या सत्रात जोरदार घसरला आहे. प्रामुख्याने केंद्र सरकारने इंडिगो कंपनी व कंपनीच्या नेतृत्वावर मोठी कारवाई करणार असल्याचे संकेत दिल्याने मोठ्या प्रमाणात देशातील सर्वात मोठी देशांतर्गत एअरलाईन्स इंडिगोला (Interglobe Aviation Limited) आजचा दिवस 'कर्दनकाळ' ठरू शकतो. केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी सोमवारी सांगितले की, इंडिगोच्या हिवाळी उड्डाण वेळापत्रकात कपात केली जाईल आणि एअरलाइनच्या अलिकडच्या मोठ्या प्रमाणात कामकाजात व्यत्यय आल्यानंतर ते इतर ऑपरेटर्सना वाटप केले जाईल.आम्ही इंडिगोचे मार्ग कमी करू.सध्या २२०० उड्डाणे चालवत आहेत. आम्ही निश्चितपणे त्या कमी करू असे संकेत दिल्याने मोठ्या कारवाईला कंपनीला सामोरे जावे लागेल. एवढेच नव्हे तर प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार येणाऱ्या काळात कंपनीच्या ५% हवाई शेअरची सरकार कपात करणार असून ती मर्यादा दुसऱ्या एअरलाईनला दिली जाईल. म्हणजेच प्रति दिवशी कंपनीची ११० हून अधिक विमान कपात केली जाणार आहे असे सांगण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सरकारने नव्या जारी केलेल्या निमयांचे पालन करण्यास कंपनी अयशस्वी ठरलीच पण त्याचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसला. कंपनीने डीजीसीए (Directorate General of Civil Aviation DGCA) नियमावलीचे उल्लंघन करत तिकीट दरातही वाढ करत परिस्थितीचा फायदा घेतला. डिसेंबर महिन्यात जवळपास २००० पेक्षा अधिक विमाने रद्द झाल्याने कंपनीला मोठ्या प्रमाणात जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

बाजारातील ट्रेडिंगमध्येही याचा फरक पडला आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये वाढलेल्या संख्येने शेअरची अस्थिरता आणखी वाढली. त्यामुळे हे व्हॉल्यूम सात महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले. २० दिवसांच्या सरासरी १२.१ लाख शेअर्सच्या तुलनेत जवळपास १.५८ कोटी शेअर्सचे कालपर्यंत व्यवहार झाले आहेत. आज सकाळी ९.५९ वाजता कंपनीच्या शेअर्समध्ये ०.६८% घसरण झाल्याने शेअर ४८९० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे.

शेअरबद्दल मूडीजने चालू असलेल्या व्यत्ययांना 'क्रेडिट नकारात्मक' असे वर्णन केल्यानंतर गुंतवणूकदारांच्या भावना आणखी कमकुवत झाल्या. कंपनीच्या आगामी महसूलातील घसरणीवर मूडीजने भाष्य केल्याने त्याचा आणखी फटका शेअरला बसला. ग्राहकांचे परतावे (Refund) भरपाई देयके आणि संभाव्य नियामक दंडांमुळे इंडिगोला महसूल तोट्याचा सामना करावा लागू शकतो असा इशारा दिला.

दरम्यान यूबीएस ब्रोकरेजने मात्र इंटरग्लोब एव्हिएशनवर बाय रेटिंग कायम ठेवले परंतु त्याची लक्ष्य किंमत (Target Price TP) ६३५० रुपयांपर्यंत कमी केली आहे ज्यामुळे एफडीटीएल रोलआउटसाठी अपुरी तयारी आणि आर्थिक वर्ष २६-२८ च्या खर्चाच्या अंदाजात वाढ झाली. असे असले तरी ब्रोकरेजच्या मते, कंपनीची वाढ (Growth)कायम राहू शकते असे म्हणत यूबीएसने म्हटले आहे की एअरलाइनचा दीर्घकालीन वाढीचा दृष्टिकोन अबाधित (Intact) आहे. आंतरराष्ट्रीय विस्तारामुळे कंपनीला फायदा होईल. जे मार्जिन स्थिरता आणि चलनाच्या दबावाविरुद्ध नैसर्गिक बचाव प्रदान करते असे ब्रोकरेजने म्हटले.

सध्या कंपनी एकूण देशांतर्गत विमान उड्डाण व्यवसायातील ६६% हिस्सा (Market Share) राखते. त्यामुळे या कंपनीच्या मक्तेदारीविरोधात जनमानसाचा रोष उफाळला असून सरकार त्याचा फायदा इतर एअरलाईन्सला देत व्यवसायाचे नवे दालन उघडेल. गेल्या आठवड्यात कंपनीच्या बाजार भांडवलात ३७००० हजार कोटीची घसरण झाली होती. कंपनीचा शेअर गेल्या काही दिवसांपासून १०% पेक्षा अधिक पातळीवर कोसळला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >