आयएएस तुकाराम मुंढे अडचणीत; भाजप आमदारांनी केली निलंबनाची मागणी

नागपूर: डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप करून भाजप आमदारांनी मंगळवारी विधानसभेत त्यांच्या निलंबनाची मागणी केली.


महाविकास आघाडी सरकारच्या काळात तुकाराम मुंढे नागपूर मनपा आयुक्त असताना त्यांनी शासनाची अधिकृत नियुक्ती नसतानाही नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभार नियमबाह्यपणे स्वतःकडे घेतला. सीईओचे अधिकार नसतानाही त्यांनी आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांची नियमबाह्य पेमेंट्स केली. तब्बल २० कोटी रुपये त्यांनी अशाप्रकारे दिल्याचा थेट आरोप भाजप आमदार कृष्ण खोपडे व प्रवीण दटके यांनी केला.


मुंढे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पातील महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केली, तसेच १७ कर्मचाऱ्यांना विनाकारण निलंबित केल्याचा आरोप खोपडे यांनी केला. खोपडे यांनी सांगितले की, हा विषय सभागृहात उपस्थित केल्यामुळे मुंढे यांच्या समर्थकांकडून त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असून, आरोपीला तात्काळ अटक करावे आणि मुंढेंवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.





सभागृहात गोंधळ


सभागृहात हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर सत्ताधारी आमदार आक्रमक झाले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यात हस्तक्षेप करीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशी होईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वस्त केले. मात्र, या उत्तरावर आमदारांचे समाधान न झाल्याने त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे तालिका अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करत स्पष्ट केले की, या प्रकरणातील वस्तुस्थिती जाणून घेऊन लवकरात लवकर सभागृहात निवेदन केले जाईल.



Comments
Add Comment

गुटखा विक्रेत्यांना 'मकोका' लावणार!- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गुटखा बंदीसाठी कायद्यात बदल करणार

नागपूर : "गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता.

विधानपरिषद सभापती-सदस्यांचा अपमान केल्याप्रकरणी सूर्यकांत मोरे हक्कभंगाच्या कचाट्यात

नागपूर: नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या एका पदाधिकाऱ्याने केलेल्या

''सीएसएमटी' स्थानकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार'

नागपूर : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाजवळ लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा

फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी ६० दिवसांत आरोपपत्र सादर करणार

नागपूर : "फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी राज्य सरकार येत्या ६० दिवसांत

विदर्भ, मराठवाड्यातील रस्त्यांचे निकष कोकणाला लावू नका!

कोकणातील रस्त्यांच्या दूरवस्थेवरून आमदार निलेश राणे विधानसभेत कडाडडले नागपूर : कोकणातील रस्त्यांची सातत्याने

IAS तुकाराम मुंढे भ्रष्टाचारी? भाजप आमदारांचा विधानसभेत गंभीर आरोप

नागपूर: नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर भाजप आमदारांनी गंभीर