Tuesday, December 9, 2025

असुरक्षित कर्ज घेण्यात भारतात मोठ्या प्रमाणात वाढ- Experian Insights

असुरक्षित कर्ज घेण्यात भारतात मोठ्या प्रमाणात वाढ- Experian Insights

वैयक्तिक कर्जाची व्यवस्थापना अंतर्गत मालमत्ता १५.९ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली 

मुंबई: डेटा आणि तंत्रज्ञान अ‍ॅनालिटिक्स कंपनी एक्सपेरियनने त्यांचा नवा क्रेडिट इनसाइट्स - असुरक्षित कर्जे, सप्टेंबर २०२५ अहवाल (Credit Insights Unsecured Loan September 2025) हा अहवाल प्रकाशित केला आहे. अहवालात प्रामुख्याने वाढलेली कर्जाची विशेषतः वैयक्तिक कर्ज (Personal loan) ,मागणी वाढत असताना क्रेडिट कार्डची गरज, दुचाकी कर्जे आणि ग्राहक सेवा कर्जांमध्ये भारताच्या वाढत्या मागणीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात या क्षेत्रात विकास होत आहे. भारतात या क्षेत्रातील किती वाढ झाली याची आकडेवारी अहवालात दिली गेली आहे. या निष्कर्षांवरून या क्षेत्रातील वित्तीय स्थिर पोर्टफोलिओत वाढ झालेली असून कामगिरी सुधारत आहे. वित्तीय प्रमुख प्रमुख उत्पादनांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यातील कर्जबुडव्यांच्या तुलनेत सुधारणा झाल्याने असुरक्षित क्रेडिट मागणीत सातत्यपूर्ण वाढ दिसून येते.

अहवालाप्रमाणे आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या तिमाहीत कर्जांचे नवीन स्रोत मजबूत राहिले आहेत. नवी वाढती तिकिट साईज एनबीएफसींकडून वाढत्या सहभागामुळे आणि कर्जदारांच्या वाढत्या परतफेडीच्या वर्तनामुळे या क्षेत्रात उभारी मिळाली आहे.

अहवालातील माहितीनुसार, भारतातील असुरक्षित कर्ज वातावरण परिपक्व होत आहे. कर्ज घेणारे कर्जदार अधिक पातळीवर अंडररायटिंग पद्धती स्वीकारत आहेत. ग्राहक वाढती क्रेडिट विषयी शिस्त पाळत असल्याने यांच्यातील क्लिष्टता कमी होत असल्याचा निष्कर्ष अहवालात काढला जात आहे.

विशेषतः मध्यम आणि उच्च-तिकीट कर्ज घेण्यातील वाढ वाढ व आत्मविश्वास दर्शवेते. सुरुवातीच्या थकबाकींमधील सुधारणा मजबूत पोर्टफोलिओ लवचिकता दर्शवितात. हे ट्रेंड आता डिजिटल कर्ज घेण्याच्या अवलंबनाचा वापर केल्याने परिणाम हे सकारात्मक आहेत. अर्ध-शहरी/ टियर ३/ टियर ४ बाजारपेठांमध्ये पारदर्शकता वाढताना दिसून आल्याचे अहवालाने म्हटले आहे.

या मांडणीवर भाष्य करताना एक्सपेरियन इन इंडियाचे कंट्री मॅनेजिंग डायरेक्टर मनीष जैन म्हणाले आहेत की,'आम्ही भारतातील असुरक्षित कर्ज देण्याच्या जागेत अर्थपूर्ण बदल पाहत आहोत. मागणी वाढतच आहे, ग्राहक हाय तिकिट साईजकडे वाटचाल करत आहेत आणि परतफेडीची वर्तणूक सातत्याने सुधारत आहे. उत्पादनांमध्ये सुरुवातीच्या थकबाकींमधील सुधारणा दर्शवते की ग्राहक आणि कर्जदार दोघेही अधिक जबाबदार, माहितीपूर्ण निवडी करत आहेत, जे परिपक्व क्रेडिट इकोसिस्टमकडे सकारात्मक ट्रेंड दर्शविते.'

अहवालातील प्रमुख मुद्दे:

१ वैयक्तिक कर्ज - (Personal Loan)

सप्टेंबर'२५ पर्यंत व्यवस्थापना अंतर्गत मालमत्ता (Asset Under Management AUM) १५.९ लाख कोटी पर्यंत वाढले आहे जे पूर्वीपेक्षा वार्षिक सरासरीपेक्षा १३% जास्त आहे.

सर्व कर्ज देणाऱ्या श्रेणी (खाजगी क्षेत्रातील बँका, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, NBFCs) ने नवीन सोर्सिंगमध्ये मजबूत वार्षिक सरासरी वाढ नोंदवली आहे.

एनबीएफसींनी त् लहान तिकिट साईज आकाराच्या १ लाख कर्जांमध्ये एनबीएफसीने (Non Banking Financial Companies NBFCs) आपला हिस्सा वाढवला.

मागील तिमाहीच्या तुलनेत सरासरी तिकिट साईज आकारात वाढ दिसून आली.

गेल्या वर्षीच्या तुलनेत सुरुवातीच्या टप्प्यातील कर्जबुडव्यांची पातळी सुधारली.

२ क्रेडिट कार्ड: (Credit Card)

सप्टेंबर'२५ पर्यंत व्यवस्थापना अंतर्गत मालमत्तेत ३.४ लाख कोटी पर्यंत वाढ झाली आहे. वार्षिक सरासरीपेक्षा ही वार्षिक बेसिसवर ९% जास्त आहे.

तीन तिमाहींच्या घसरणीनंतरही नवीन मंजूर कर्जात १३% तिमाही वाढ झाली. वार्षिक सरासरीपेक्षा किंचित कमी (~१%) आहे.

क्रेडिट कार्ड व्यवस्थापना अंतर्गत मालमत्तेत (AUM) वर टॉप ४ कंपनीचे वर्चस्व आहे. त्यांनी पोर्टफोलिओचा वाटा ७०% वरून ७२% वार्षिक सरासरीपर्यंत वाढला आहे

बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये सरासरी क्रेडिट मर्यादा वाढल्या आहेत सप्टेंबर’२५ पर्यंत निव्वळ ९०+ कर्जबुडव्यांचा दर २.०% वरून १.८% वार्षिक सरासरीपर्यंत वाढला आहे.

३ दुचाकी कर्जे: (2W)

सप्टेंबर’२५ पर्यंत व्यवस्थापना अंतर्गत मालमत्ता १.८ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे जो वार्षिक सरासरी सरासरीपेक्षा १८% वाढ दर्शवितो.

आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या तिमाहीत नवीन कर्जांच्या मंजूर रकमेत वार्षिक सरासरीपेक्षा ९% वाढ झाली आहे.

एनटीसी (New to Credit NTC) ग्राहकांकडून जास्त सोर्सिंगमुळे विना बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) चा दुचाकी कर्ज विभागात मजबूत बाजार हिस्सा आहे.

हाय तिकिट साईजमध्ये (१-२ लाख) वाढतच राहिली आहे. निव्वळ ३० पेक्षा अधिक कर्जबुडव्यांचा दर वार्षिक ६.२% वरून ५.४% पर्यंत कमी झाला. जरी निव्वळ ९० हून अधिक कर्जबुडव्यांचा दर अजूनही वाढलेला आहे.

४ ग्राहकोपयोगी कर्ज (Consumer Durables)

सप्टेंबर २५ पर्यंत व्यवस्थापना अंतर्गत मालमत्तेत (AUM) १ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे पण जो वार्षिक १६% वाढ दर्शवितो.

नवीन कर्जांच्या सोर्सिंगमध्ये वार्षिक २२% वाढ झाली, जी असुरक्षित उत्पादनांमध्ये सर्वात जलद आहे.

मजबूत किरकोळ प्रवेशामुळे NBFCs ग्राहकोपयोगी कर्जाच्या सोर्सिंगवर वर्चस्व गाजवत राहिले असे अहवालात म्हटले आहे.

कर्जाच्या प्रमाणात २०००० रुपयांपेक्षा कमी कर्जांचा वाटा सुमारे ६५% होता.

पोर्टफोलिओ कर्जबुडव्यांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे, जी निव्वळ ३०+ आणि निव्वळ ९०+ कर्जांच्या दरांमध्ये घट दर्शवते.

एक्सपेरियन क्रेडिट इनसाइट्स - (Insights) - असुरक्षित कर्जदारांना ग्राहकांच्या क्रेडिट वर्तनाचा आणि भावी जोखीम नमुन्यांचा व्यापक, डेटा-आधारित दृष्टिकोन कंपनी प्रदान करते. एक्सपेरियनचे विश्लेषण, क्रेडिट इंटेलिजन्स आणि सखोल उद्योग कौशल्याचा वापर करून, वित्तीय संस्था वित्तीय निर्णय सक्षमपणे घेण्याची क्षमता वाढवू शकतात असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >