मोहित सोमण: उद्या युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल का याचा निर्णय गव्हर्नर जेरोमी पॉवेल घोषित करतील. याचा अंतरिम परिणाम संपूर्ण जगभरातील अर्थव्यवस्थेवर अपेक्षित आहे. याच कारणामुळे आजही संमिश्र प्रतिसाद कायम राहिल्याने कमोडिटी बाजारातही अस्थिरता कायम आहे. मात्र जवळपास युएस बाजारातील ८९% तज्ञांना दरकपात अपेक्षित असल्याने त्याचा परिणाम डॉलर निर्देशांकात दिसला. आज काही प्रमाणात सकाळपासूनच डॉलर निर्देशांकात घसरण झाल्याने रूपयांची रिकव्हरी बाजारात झाली. परिणामी आज सोने स्वस्त झाले. 'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ३३ रुपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ३० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात २५ रूपयांनी घसरण झाली. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १३००९ रूपये, १८ कॅरेटसाठी ९७५७ रूपयांवर पोहोचले आहेत. तर प्रति तोळा किंमत २४ कॅरेटसाठी ३३० रूपये, २२ कॅरेटसाठी ३०० रुपयांनी, १८ कॅरेटसाठी २५० रूपयांनी घसरली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १३००९० रूपये, २२ कॅरेटसाठी ११९२५० रूपये, १८ कॅरेटसाठी ९७५७० रूपयांवर पोहोचले आहेत.
भारतातील मुंबईसह प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १३००९, २२ कॅरेटसाठी ११९२५, १८ कॅरेटसाठी ९७७२ रूपये आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील सोन्याच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.०८% वाढ झाल्याने दरपातळी १३००६४ आहे. याशिवाय जगभरातील सोन्याची दरपातळी पाहता संध्याकाळपर्यंत सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.३८% वाढ झाली आहे तर जागतिक पातळीवरील सोन्याचा मानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत ०.३२% वाढ झाल्याने दरपातळी डॉलरमागे ४२०४.५६ प्रति औंसवर गेली आहे.
उद्याच्या निर्णयपायी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात सावधगिरी बाळगावी लागल्याने बाजारात मागणीत घसरण झाली. दरम्यान डिसेंबरमध्ये आतापर्यंत सोन्याच्या किमतीत काहीशी कमजोरी दिसून आली आहे, परंतु अमेरिकेतील व्याजदर कमी झाल्यामुळे सलग चार महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात सोने वाढ होते. मंगळवारी मोठ्या प्रमाणात धातूच्या किमतीही स्थिर होत्या, तर गेल्या आठवड्यात झालेल्या तीव्र वाढीनंतर चांदीचा भाव विक्रमी उच्चांकाच्या जवळ होता.स्पॉट गोल्ड ०.१% घसरून प्रति औंस $४१८६.१८ वर आला, तर फेब्रुवारीसाठी सोन्याचा वायदा किंचित घसरून $४२१५.४०/औंस झाला आहे.
सोन्यावर तज्ञांनी काय म्हटले?
एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी -
सोन्याचा भाव सकारात्मक व्यवहार करत होता, कॉमेक्स $१६ किंवा ०.४०% वाढून ४२०८ डॉलरवर पोहोचला, तर MCX सोन्याचा भाव १३० ने किंचित वाढून १३०१०० वर पोहोचला कारण देशांतर्गत रुपया मजबूत झाल्याने तो वाढला आहे. बाजार या आठवड्याच्या फेडरल रिझर्व्ह धोरणावर लक्ष केंद्रित करत आहेत, जिथे ०.२५% व्याजदर कपात आधीच करण्यात आली आहे, परंतु स्टेटमेंट, भविष्यातील मार्गदर्शन आणि आर्थिक दृष्टिकोन नवीन गतीला चालना देतील. पॉवेल यांचा कार्यकाळ संपत आला असल्याने, दीर्घकालीन सुलभीकरण चक्राच्या आसपासच्या अपेक्षा सोने आणि चांदीसाठी व्यापक रचनात्मक दृष्टिकोन ठेवत आहेत. पॉलिसी इव्हेंटपूर्वी सोने १२८००० ते १३१५०० रुपयांच्या श्रेणीत व्यापार होण्याची अपेक्षा आहे.'
चांदीतही घसरण सुरू -
आज सोन्याप्रमाणे घसरण न होता चांदीच्या दरात मात्र वाढ झाली आहे. सोन्याला पर्याय म्हणून चांदीचे आवाहन युएस बाजारातील धुरंधरांनी केले होते. त्याचाच परिणाम म्हणून सोन्याला पर्याय म्हणून चांदीच्या मागणीत व गुंतवणूकीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गुंतवणूकीशिवाय औद्योगिक मागणीमुळे चांदीचा पुरवठा घटला. तसेच उद्या जाहीर होणारा फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील अनिश्चितेमुळे गुंतवणूकदारांनी चांदीतील गुंतवणूकीत वाढ केली आणि चांदी महागली आहे. 'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात १ रूपयाने वाढ झाल्याने रूपया १९० रूपये, प्रति किलो दर १९०००० रूपयांवर बाजारात पोहोचला आहे. भारतीय सराफा बाजारात चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर १९०० तर प्रति किलो १९०००० रूपये आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.८०% वाढ झाल्याने दरपातळी १८३१९९ रूपयांवर पोहोचली. जागतिक बाजारातील सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.०८% वाढ झाली आहे. या वर्षी चांदीचे मूल्य दुप्पट झाले आहे, सोन्याला मागे टाकत, महागड्य किमतींमुळे व्यापाऱ्यांना चांदीमध्ये पर्यायी गुंतवणूक शोधण्यास भाग पाडले गेले.






