प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्‍यासाठी पाच दिवसांची मुदतवाढ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्‍य निवडणूक आयोगाने मतदार यादीशी संबंधित सुधारित कार्यक्रम आज मंगळवार, ९ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर केला आहे. त्‍यानुसार, महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्‍याची मुदत सोमवार, १५ डिसेंबर २०२५ रोजीपर्यंत म्‍हणजेच पाच दिवस वाढवण्‍यात आली आहे.


महाराष्‍ट्र राज्‍यातील २९ महानगरपालिकांच्‍या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम माननीय राज्‍य निवडणूक आयोगाकडून १४ ऑक्‍टोबर २०२५ आणि २६ नोव्‍हेंबर २०२५ रोजी जाहीर करण्‍यात आला. त्‍यानुसार, प्रारूप मतदार यादीवर दाखल हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्‍याचा निर्धारित कालावधी १० डिसेंबर २०२५ असा होता. आता सुधारित वेळापत्रकानुसार, प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्‍याचा निर्धारित कालावधी १५ डिसेंबर २०२५ असा करण्‍यात आला आहे. म्‍हणजेच ५ दिवसांची मुदतवाढ देण्‍यात आली आहे.


मतदान केंद्राच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करण्‍याचा निर्धारित कालावधीपूर्वी १५ डिसेंबर २०२५ होता. सुधारित वेळापत्रकानुसार, मतदान केंद्राच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करण्‍याचा निर्धारित कालावधी २० डिसेंबर २०२५ असा आहे. तसेच, मतदान केंद्रनिहाय मतदारयादी प्रसिद्ध करण्‍याचा यापूर्वीचा कालावधी २२ डिसेंबर २०२५ असा होता. त्‍यात सुधारणा करून मतदान केंद्रनिहाय मतदारयादी प्रसिद्ध करण्‍याची सुधारित तारीख २७ डिसेंबर २०२५ अशी निश्चित करण्‍यात आली आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही

तब्बल २८ तासांच्या प्रयत्नानंतर जलवाहिनी बदलण्याचे काम पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : जुन्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करून त्यांना कार्यक्षम, सुरक्षित आणि दीर्घकालीन

कूपर रुग्णालयात अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली, सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : डॉ. रूस्‍तम नरसी कूपर रुग्णालयातील रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांचे तातडीने आणि

मुंबईत शुक्रवारी आणि शनिवारी राहणार या भागात पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विलेपार्ले अंधेरी पूर्व भाग (के पूर्व विभाग), वांद्रे पूर्व भाग(एच पूर्व विभाग )तसेच

महाराष्ट्रात २०२६ मध्ये २४ सार्वजनिक सुट्ट्या

मुंबई : महाराष्ट्र शासनाने २०२६ या वर्षासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी २४ सार्वजनिक सुट्ट्या जाहीर

विठुनामाच्या जयघोषाने मुंबापुरी दुमदुमणार

मुंबई : वारकरी संप्रदायाच्या वैचारिक ऐश्वर्याचे दर्शन मुंबईकरांना घडावे यासाठी गेली २६ वर्ष सुरू असणारा