प्रवीण समजीस्कर मृत्यू प्रकरणातील तीन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल
बदलापूर : सह्याद्री सुपर सपेशालिस्ट हॉस्पिटलमधील तीन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. डॉ. योगेश मिंडे , डॉ अनंत ठाणगे आणि डॉ .मनीष वाधवा या तिघांची नावे या प्रकरणात आहेत.ही कारवाई प्रवीण समजीस्कर याच्या मृत्यू प्रकरणाशी संबधित आहे .
प्रवीण समजीस्कर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता .कुटुंबीयांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता .कुटुंबासोबत काही समाजसेवकांनीही गेल्या वर्षभरापासून आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरठा केला .
मिळालेल्या माहितीनुसार ,प्रवीण समजीस्कर दुचाकीवरून पडल्याने त्याच्या चेहऱ्यावर किरकोळ दुखापत झाली होती . ही जखम साधी असतानाही हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला .
मात्र शस्त्रक्रिया करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला .या घटनेनंतर कुटुंबीयांनी मृत्यू संशयास्पद असल्याने तक्रारी केल्या होत्या .आरोग्य विभागाच्या चौकशीनंतर डॉक्टरांचा हलगर्जीपणा ठळकपणे समोर आला .त्यानंतर बदलापूर पश्चिम ठाण्यात तिन्ही डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले . एकाच वेळी तीन डॉक्टरांवर केस नोंद नोंदवल्याने बदलापूर वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे .






