ढाका : बांगलादेशमध्ये शेख हसिना यांचे बहुमतातले सरकार होते. पण शत्रू देशांच्या मदतीने बांगलादेशमधील देशद्रोह्यांनी हे सरकार पाडले. यानंतर बांगलादेशची वाताहात सुरू झाली आहे. कट्टरतेकडे झुकत असलेला बांगलादेश आता कर्जबाजारी होऊ लागला आहे.
कर्जाचे धक्कादायक आकडे समोर,पाकिस्तानसारखी हालत...
बांगलादेश गंभीर कर्ज संकटात अडकत चालला आहे. वर्ल्ड बँकेकडून धक्कादायक आकडे समोर आले आहेत. पाकिस्तानप्रमाणे बांगलादेशसुद्धा संकटाच्या दरीत कोसळत आहे. बांगलादेशमधील आर्थिक संकट वाढत चाललं आहे. पाकिस्तान गळ्यापर्यंत कर्जात बुडाला आहे. स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी पाकिस्तान सतत IMF कडे मदत मागत आहे. आता भारताचा आणखी एक शेजारी बांगलादेश आर्थिक विवंचनेत अडकत चालला आहे.
बांगलादेश मागील पाच वर्षात पुरता कर्जामध्ये बुडाला आहे. कर्जाच्या या विळख्यातून बाहेर येणं बांगलादेशसाठी अजिबात सोपं नाही. बांगलादेश कर्जाच्या जाळ्यात अडकला आहे हे बांगलादेश नॅशनल बोर्ड ऑफ रेवेन्यूचे (NBR) चेअरमन मोहम्मद अब्दुर रहमान खान यांनीच जाहीर केले आहे. जागतिक बँकेच्या अहवालातून ही बाब अधोरेखीत झाली आहे.
बांगलादेशवर परदेशी कर्ज एकूण ४२ टक्क्यांनी वाढले आहे. आकडेवारीनुसार २०२४ च्या अखेरपर्यंत बांगलादेशवरील एकूण बाहेरील कर्ज १०४.४८ अब्ज डॉलर होतं. तेच २०२० मध्ये ७३.५५ अब्ज डॉलर होतं. दुसऱ्या बाजूला २०२४ मध्ये पाकिस्तावर बाहेरील कर्ज १३० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचलं आहे. जागतिक बँकेच्या आकड्यांवरुन ही माहिती समोर आली आहे. जागतिक बँकेने बांगलादेशचा समावेश त्या देशांमध्ये केला आहे,ज्यांच्यावर बाहेरील कर्ज फेडण्याचा दबाव वेगाने वाढतोय.
बांग्लादेशने IMF कडून किती कर्ज घेतलय?
बांग्लादेश आणि पाकिस्तान दोघांनी IMF कडून कर्ज घेतलं आहे. IMF च्या १५ ऑक्टोंबर 2२०२५ च्या रिपोर्टनुसार पाकिस्तानने८.९६ अब्ल डॉलर्सच कर्ज घेतलं आहे. तर बांगलादेशने ३.९७ अब्ज डॉलर्सच कर्ज घेतलं आहे.






