Thursday, January 22, 2026

महाराष्ट्रात २०२६ मध्ये २४ सार्वजनिक सुट्ट्या

महाराष्ट्रात २०२६ मध्ये २४ सार्वजनिक सुट्ट्या
मुंबई : महाराष्ट्र शासनाने २०२६ या वर्षासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी २४ सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. भाऊबीज (११ नोव्हेंबर २०२६, बुधवार) यादिवशी अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे, सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये प्रमुख सण आणि राष्ट्रीय दिवसांचा समावेश आहे. या सुट्या महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालये, राज्य शासनाचे उपक्रम, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती यांना लागू राहील. याशिवाय १ एप्रिल २०२६ (बुधवार) हा दिवस केवळ बँकांसाठी वार्षिक लेखापरीक्षणासाठी सुट्टी म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
  1. प्रजासत्ताक दिन - सोमवार २६ जानेवारी
  2. महाशिवरात्री - रविवार १५ फेब्रुवारी
  3. छत्रपती शिवाजी महाराज जयंती - गुरुवार १९ फेब्रुवारी
  4. होळी - मंगळवार ३ मार्च
  5. गुढीपाडवा - गुरुवार १९ मार्च
  6. रमझान ईद - शनिवार २१ मार्च
  7. रामनवमी - गुरुवार २६ मार्च
  8. महावीर जन्म कल्याणक किंवा महावीर जयंती - मंगळवार ३१ मार्च
  9. फक्त बँकांना वार्षिक लेखे पूर्ण करण्यासाठी - बुधवार १ एप्रिल
  10. गुड फ्रायडे - शुक्रवार ३ एप्रिल
  11. डॉ. बाबासाहेब आंबेडकर - मंगळवार १४ एप्रिल
  12. महाराष्ट्र दिन - शुक्रवार १ मे
  13. बुद्ध पौर्णिमा - शुक्रवार १ मे
  14. बकरी ईद - गुरुवार २८ मे
  15. मोहरम - शुक्रवार २६ जून
  16. स्वातंत्र्य दिन - शनिवार १५ ऑगस्ट
  17. पारशी नववर्ष दिन - शनिवार १५ ऑगस्ट
  18. ईद-ए-मिलाद - बुधवार २६ ऑगस्ट
  19. गणेश चतुर्थी - सोमवार १४ सप्टेंबर
  20. महात्मा गांधी जयंती - शुक्रवार २ ऑक्टोबर
  21. दसरा - मंगळवार २० ऑक्टोबर
  22. दिवाळी अमावस्या, लक्ष्मीपूजन - रविवार ८ नोव्हेंबर
  23. दिवाळी, बालिप्रतिपदा - मंगळवार १० नोव्हेंबर
  24. गुरुनानक जयंती - मंगळवार २४ नोव्हेंबर
  25. ख्रिसमस किंवा नाताळ - शुक्रवार २५ नोव्हेंबर
Comments
Add Comment