नागपूर : राज्याचे हिवाळी अधिवेशन सोमवार ८ डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून नागपूर येथे सुरू झाले. या अधिवेशनाची सुरुवात देशाचे राष्ट्रीय गीत असलेल्या वंद मातरमने झाले. विधान परिषदेत संपूर्ण वंदे मातरम गीत सामूहिकपणे गायले गेले.
वंदे मातरम्! सुजलाम्, सुफलाम्, मलयज शीतलाम्, शस्यश्यामलाम्, मातरम्! वंदे मातरम्! महाराष्ट्र विधिमंडळाच्या 'हिवाळी अधिवेशन 2025'ची सुरुवात...#Maharashtra #Nagpur #WinterSession2025 pic.twitter.com/qBCdTbOi0h
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 8, 2025
नियोजनानुसार विधान परिषदेत कामकाज दुपारी बारा वाजता सुरू झाले. कामकाजाची सुरुवात वंदे मातरम आणि राज्यगीताने झाली.
या वर्षी, वंदे मातरम गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त, सभागृहात संपूर्ण गीत सामूहिकपणे गायले गेले. सदस्यांनी उभे राहून आदरपूर्वक गीत गायले, ज्यामुळे सभागृहात एक विशेष वातावरण निर्माण झाले.
वंदे मातरम आणि राज्यगीतानंतर, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विभागीय मंत्र्यांनी त्यांच्या संबंधित मंत्रालयांशी संबंधित विविध अध्यादेश मांडले. यामध्ये महसूल, पणन, ग्रामीण विकास आणि कामगार विभागांशी संबंधित अध्यादेशांचा समावेश होता.
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा!🚩
राज्यगीताच्या प्रेरणादायी सुरांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या 'हिवाळी अधिवेशन 2025'चा प्रारंभ...#Maharashtra #Nagpur #WinterSession2025 pic.twitter.com/VZSroPitKJ — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 8, 2025






