डॉ. सर्वेश सुहास सोमण
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सची म्हणजेच पाव टक्क्यांची कपात करत तो ५.२५ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर नवा रेपो रेट जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे रेपो रेट ५.५० टक्क्यांवरून ५.२५ टक्क्यांवर आला आहे. जो गेल्या काही वर्षांतील सर्वात कमी आहे.
रेपो रेट म्हणजे काय?
जेव्हा जेव्हा आरबीआय रेपो रेट कमी करते, तेव्हा कर्जाचे हप्ते घटतात. रेपो रेट म्हणजे असा व्याजदर ज्यावर बँका आरबीआयकडून कर्ज घेतात. स्वतःसाठी कर्ज स्वस्त झाल्यास बँका हा लाभ ग्राहकांपर्यंतही पोहोचवतात. आता रेपो रेटमध्ये कपात झाल्याने, गृहनिर्माण आणि वाहन कर्जांसह किरकोळ कर्जांवरील व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे.
रिव्हर्स रेपो दर (Reverse Repo Rate)
जेव्हा व्यावसायिक बँकांकडे अतिरिक्त निधी (surplus funds) असतो आणि त्यांना तो सुरक्षितपणे गुंतवायचा असतो, तेव्हा त्या हा निधी रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. रिझर्व्ह बँक या निधीवर बँकांना जे व्याज देते, त्या दराला 'रिव्हर्स रेपो दर' म्हणतात.
आरबीआय ने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा महागाईचा अंदाज २.६ टक्क्यांवरून २ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे.
पुढील आठवड्याचा विचार करता निर्देशांक निफ्टीची गती आणि दिशा दोन्ही तेजीची असून निफ्टीची २६००० ही महत्त्वाची पातळी आहे. जोपर्यंत निफ्टी या पातळीच्या वर आहे तोपर्यंत निर्देशांकातील तेजी टिकून राहील.
मागील आठवड्यात झालेल्या तेजीनंतर पुढील आठवड्यात निफ्टीमध्ये आणखी २०० ते २५० अंकांची तेजी होणे अपेक्षित आहे.
शेअर्सचा विचार करता वोखार्ट फार्मा, नारायण हृदयालय, हिरोमोटो कॉर्प यासह अनेक शेअर्सची दिशा तेजीची आहे.
(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)
samrajyainvestments@gmail.com






