Sunday, December 7, 2025

मिलिंद साठे राज्याचे नवे महाधिवक्ता, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मिलिंद साठे राज्याचे नवे महाधिवक्ता, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

नागपूर : राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्या राजीनाम्यानंतर नवे महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठे यांच्या नावावर राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील रामगिरी या शासकीय निवासस्थानी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत साठे यांच्या नावावर अंतिम मोहोर उमटवण्यात आली.

आझाद मैदानात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयात दाखल झाला असताना, सप्टेंबर २०२५ मध्ये बिरेंद्र सराफ यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, पुढील व्यवस्था होईपर्यंत त्यांना या पदाचे काम पाहण्याची विनंती राज्य सरकारकडून करण्यात आली होती. त्यानुसार, ते आतापर्यंत कामकाज हाताळत होते. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नवे महाधिवक्ता नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.

मिलिंद साठे यांचा विधि क्षेत्रातला अनुभव अतिशय दांडगा आहे. मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी अनेक वर्षे वरिष्ठ वकील म्हणून काम केले.

Comments
Add Comment