पुणे : पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मानव-बिबटयामधील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. मोकाट फिरण्याऱ्या बिबट्याचा शोध लावताना काय करावे. यावर ऑस्ट्रेलियातून आलेल्या तज्ज्ञांनी पुणे वन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. बिबट्याला पकडताना काय काळजी घ्यावी यावर मास्टरक्लास संपन्न झाला.
सत्राचे वैशिष्ट्य म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील लीगसी वाईल्डलाईफ फाउंडेशन आणि वेटेक्स साउथ अफ्रिका या संस्थांकडून तज्ज्ञ मंडळी उपस्थित होती. 'वन्यजीव सुरक्षित कसे पकडावेत' याविषयी वन्यजीव तज्ज्ञ हाइन शोमन, डॉ. जोसेफिन स्कारुप पिटरसन यांनी मार्गदर्शन केले. आधुनिक वन्यजीव उपचार तंत्र आणि ट्रॅंक्विलायझेशन पद्धतींमध्ये प्रावीण्य असलेले डॉ. जोसेफिन स्कारुप पीटरसन हेही उपस्थित होते. पुण्याचे वनसंरक्षक आशीष ठाकरे व रेस्क्यू संस्थेच्या पुढाकाराने प्रशिक्षण सत्र संपन्न झाले. या सत्रात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, जुन्नर, पुणे आणि सोलापूर विभागातील ४० हून अधिक वन अधिकारी सहभागी झाले होते. हे अधिकारी वनहद्दी व्यवस्थापन, मानव-वन्यजीव संघर्ष आणि संघर्षग्रस्त भागांमध्ये सक्रियपणे काम करत आहेत. प्रामुख्याने प्रत्यक्ष घटनास्थळावरची स्थिती कशी हाताळावी, वनहद्दी व्यवस्थापन, वन्यप्राण्यांची काळजी आणि परिसंस्था पातळीवरील व्यवस्थापन यावर त्यांनी भर दिला.