अर्पोरा: गोव्यातील अर्पोरा गावातील एका नाईट क्लबमध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास भीषण आग लागली. बर्च बाय रोमियो लेन असे या रेस्टॉरंटचे नाव असून गोव्यातील नाईट क्लबसाठी ते प्रसिद्ध आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे झालेल्या या दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला, ज्यात चार पर्यटक आणि इतर सर्व क्लबचे कर्मचारी आहेत. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ते रेस्टॉरंटच्या आतमध्ये गेले तेव्हा धुराचे लोट आणि जमिनीवर पसरलेले मृतदेह दिसले. गोव्यातील अर्पोरा येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येकाच्या नातेवाईकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपये तर जखमींना ५०,००० रुपये मदत जाहीर केली आहे.
या घटनेवर दुःख व्यक्त करताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मृतांच्या कुटुंबियांना धीर दिला आहे. त्यांनी सांगितले की, ही राज्याच्या पर्यटन इतिहासातील सर्वात मोठ्या घटनांपैकी एक दुर्घटना आहे. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी परिस्थितीचे परीक्षण करून सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. क्लबमध्ये सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाले का? अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत होती का? याची चौकशी सुरू आहे. दरम्यान स्थानिक प्रशासनाने मृतांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तर जखमी आणि बाधित लोकांसाठी मदत केंद्रे सुरू केली जात आहेत.
मुंबई (विशेष प्रतिनिधी): पश्चिम उपनगरात नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मालाड मालवणी येथील नव्याने उभारण्यात आलेल्या नागरी ...






