Sunday, December 7, 2025

Smruti Mandhana | अखेर स्मृतीने मौन सोडले, पलाशसोबत लग्न न करण्याचा निर्णय!

Smruti Mandhana | अखेर स्मृतीने मौन सोडले, पलाशसोबत लग्न न करण्याचा निर्णय!

मुंबई: मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या स्मृती आणि पलाशच्या लग्नाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. स्मृतीने अखेर या विषयावर मौन सोडले असून लग्न रद्द झाल्याचे सोशल मीडीयाद्वारे सांगितले आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम खात्यावर स्टोरी टाकत लिहले आहे, गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याभोवती अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत आणि मला वाटते की सध्या मी बोलणे महत्त्वाचे आहे. मी एक अतिशय खाजगी व्यक्ती आहे असून मला असेच राहायचे असले तरी मला हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की लग्न रद्द करण्यात आले आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

माझ्यासाठी एक उच्च उद्देश आहे ते म्हणजे सर्वोच्च स्तरावर माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे. मला आशा आहे की, मी शक्य तितक्या काळ भारतासाठी खेळत राहीन आणि ट्रॉफी जिंकत राहीन आणि तिथेच माझे लक्ष कायमचे राहील. मी हा विषय येथेच संपवू इच्छिते आणि तुम्हा सर्वांनाही असेच करण्याची विनंती करते. मी तुम्हाला विनंती करते की कृपया यावेळी दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा आणि आम्हाला आमच्या पद्धतीने पुढे जाण्यासाठी वेळ द्या. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. पुढे जाण्याची वेळ आली आहे. स्मृतीच्या या निर्णायक पोस्टनंतर पलाशने देखील इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्याने लिहले आहे, मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा आणि माझ्या वैयक्तिक नात्यांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यासाठी सर्वात पवित्र असलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल निराधार अफवांवर लोक इतक्या सहजपणे प्रतिक्रिया देतात हे पाहणे माझ्यासाठी खूप कठीण होते. हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा आहे आणि मी माझ्या विश्वासावर ठाम राहून त्याचा सामना करेन.
 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

मला खरोखर आशा आहे की आपण एक समाज म्हणून, अशा व्यक्तीबद्दल बोलण्यापूर्वी थांबायला शिकू ज्याचे स्रोत कधीही ओळखले जात नाहीत. आपले शब्द अशा प्रकारे दुखवू शकतात जे आपल्याला कधीही समजणार नाहीत. आपण या गोष्टींबद्दल विचार करत असताना, जगातील अनेक लोकांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत आहे. माझी टीम खोटी आणि बदनामीकारक सामग्री पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करेल. या कठीण काळात माझ्या पाठीशी उदारतेने उभे राहिलेल्या प्रत्येकाचे आभार. अशाप्रकारे पलाश आणि स्मृतीच्या लग्नाचा विषय संपला आहे.
Comments
Add Comment