मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिची मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना'मुळे चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत ती स्वानंदीच्या भूमिकेत झळकली आहे. या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच मराठी अभिनेता सुबोध भावेसोबत ती मालिकेत दिसत आहे. तेजश्री प्रधानला 'होणार सून मी या घरची' मधून खूप लोकप्रियता मिळाली. अशात तिच्या कामाची पोचपावती तिला मिळाली आहे.
तेजश्री प्रधानला कला विश्वातील मोठ्या पुरस्कारानं गौरवण्यात आले आहे. नुकताच तिला ‘राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार २०२४’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार स्वीकारल्यावर तिने एक खास भावनिक पोस्ट केली आहे. तिला हा मानाचा पुरस्कार महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते मिळाला. तेजश्रीने मिळवलेल्या या यशामुळे चाहते आणि कलाकारांकडून तिचे कौतुक होत आहे.






