आज चांदी महागली ! गेल्या एक आठवड्यात ८३०० रूपयाने चांदी उसळली १ महिन्यात २०% तर २ वर्षांत चांदीच्या दरात वाढ १३३% वाढ नव्या गुंतवणूकदारांनी काय करावे? जाणून घ्या

मोहित सोमण: आज चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सलग तिसऱ्यांदा चांदीत मोठी वाढ झाली असल्याने चांदी आज प्रति किलो ३००० रूपयांनी वाढली असून गेल्या तीन दिवसात ६००० रूपयांनी वाढ झाली आहे. तर एका आठवड्यात चांदी ८३०० रुपयांनी वाढली आहे. तर महिन्यात चांदीच्या दरातही २०% वाढ झाली असून आगामी काळातही तज्ञांच्या मते बाजारात फेरबदल अपेक्षित होऊन चांदी एका नव्या पातळीवर जाऊ शकते. युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची अपेक्षा असल्याने व आंतरराष्ट्रीय स्तरावरील चांदीच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने चांदी दरपातळी आजही महागली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार चांदीच्या प्रति ग्रॅम दरात आज ३ रूपयांनी वाढ झाली असून प्रति किलो दर ३००० रुपयांनी वाढल्याने प्रति ग्रॅम दर १९० व प्रति किलो दर १९०००० रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे सरासरी प्रति १० ग्रॅम दर १९०० तर प्रति किलो दर १९०००० रूपयांवर पोहोचले आहेत.


भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत २.७९% वाढ झाल्याने दरपातळी १८३१०० रूपयांवर पोहोचली आहे. जागतिक बाजारातील सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत २.७२% वाढ झाली आहे. पुढील आठवड्यात युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील निर्णय युएस फेड गव्हर्नर जेरोमी पॉवेल जाहीर करतील. बाजार तज्ञांच्या मते ही दरकपात झाल्यास त्याचा मोठा फायदा बाजारात होईल दरम्यान तत्पूर्वी सोन्याच्या व चांदीच्या दरात चढ उतार मोठ्या प्रमाणात राहू शकते. खासकरून युएस बाजारातील घसरलेल्या रोजगार आकडेवारीनंतर पीसीई आकडेवारी अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे पीसीई (Personal Consumption Expenditure PCE) आकडेवारी जाहीर झाल्यानंतर कमोडिटी बाजारातील पुढील दिशा स्पष्ट होईल. भूराजकीय घडामोडींचाही परिणाम होत असल्याने प्राईज करेक्शन पुढील आठवड्यात अपेक्षित असले तरी अस्थिरतेचा फटका चांदीच्या दरात बसत आहे. आज डॉलर किरकोळ घसरण अथवा सपाट स्थितीत कायम असल्याने गुंतवणूकदारांनी आपल्या होल्डिंग्समध्ये वाढ केल्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा विविध कारणांमुळे आज चांदी महागली.


चांदीच्या किमतीतील दीर्घकालीन वाढीचा विचार केल्यास एमसीएक्सवरील स्पॉट प्राईस फक्त एका वर्षात ९८% वाढून ८९९१३ रुपयांवरून १७७८८६ रुपयांवर पोहोचली. उपलब्ध माहितीनुसार, दोन वर्षांत किंमत १३३% आणि ३ वर्षांत जवळजवळ १८२% वाढली असून एका दशकात चांदीच्या किमती ४१९% वाढल्या आहेत.


नवीन गुंतवणूकदारांसाठी तज्ञ काय म्हणाले?


नवीन गुंतवणूकदार हळूहळू एका लहान टप्प्यात गुंतवणूक करू शकतात जेणेकरून भविष्यातील कोणत्याही वाढीचा फायदा घेता येईल आणि अचानक किमतीच्या वेळी प्रवेश गुंतवणूकदारांना करण्याचा धोका टाळता येईल.

Comments
Add Comment

पुण्यात पोलीस हवालदारानं मुलीच्या पहिल्या वाढदिवशी उचललं टोकाचं पाऊल

पुणे : 'तुझा पहिला वाढदिवस दणक्यात साजरा करायचा होता पण मी पोलीस खात्यात नोकरी करतो, वरिष्ठ मला त्रास देतात. यामुळे

फॉलोअर्सच्या शर्यतीत मुलांचं बालपण धोक्यात, सुधा मूर्तींची सरकारकडे महत्त्वाची मागणी

नवी दिल्ली : इंटरनेटवर आज असंख्य रील्स आणि व्हिडिओ पाहायला मिळतात ज्यात लहान मुलांचा थेट कंटेंट म्हणून वापर केला

माजी लोकसभाध्यक्षांना 'ब्रह्मभूषण' पुरस्कार जाहीर

मुंबई : माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 'ब्रह्मभूषण’ २०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा

सायबर भामट्यांकडून ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकाची १.२५ कोटीची फसवणूक

मुंबई: ठाणे पश्चिम एका ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची सायबर गुन्हेगारांनी १.२५ कोटीची फसवणूक केली आहे. डेटा

उड्डाणं रद्द, तिकीटदर वाढले; हवाई प्रवासातील गोंधळावर सरकारची मोठी कारवाई

नवी दिल्ली : इंडिगोच्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय अडचणींमुळे मागील काही दिवसांपासून देशात मोठे विमान प्रवास

मोठी बातमी - या वर्षाच्या आत भारत अमेरिका व्यापारी करार होणार पडद्यामागे राजकीय हालचाली सुरू

प्रतिनिधी: यावर्षाच्या अखेरीस भारत व युएस यांच्यातील द्विपक्षीय करार (Bilateral Free Trade Agreement FTA) तडीस जाण्याची शक्यता आहे.