‘बिग बॉस’ हिंदीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्याकडे आला आहे. ‘बिग बॉस’मधून अलीकडेच मालती चहरची एक्झिट झाली. त्यानंतर आता ‘बिग बॉस’च्या घरात प्रणीत मोरे, गौरव खन्ना, अमाल मलिक, फरहाना भट्ट, तान्या मित्तल हे स्पर्धक आहेत.
‘बिग बॉस’च्या घरात आता शेवटचे काही दिवस राहिले असून या स्पर्धकांपैकी कोण ‘बिग बॉस’ची ट्रॉफी पटकावणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असल्याचे पाहायला मिळतेय; तर सध्या सोशल मीडियावर प्रेक्षकांसह कलाकार मंडळीही त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा देत आहेत.
अभिनेत्री शिल्पा शिरोडकर, जिने ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सहभाग घेतला होता तिने आता ‘बिग बॉस’बद्दल एक्सवर ट्वीट करत तिच्या आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला आहे. तिने यावेळी या पोस्टमधून म्हटलं की, “मला माहितीये प्रत्येकाचा कोणीतरी आवडता स्पर्धक आहे. पण, माझ्यासाठी फक्त एकच पर्याय आहे, तो म्हणजे प्रणीत मोरे. मला असं खूप मनापासून वाटतं की तो एकमेव असा स्पर्धक आहे, जो सातत्याने खरा वागला आहे. आपणही त्यांच्याबरोबरच स्वत:ला रिलेट करतो, जे खूप खरे वाटतात आणि तो अगदी तसाच आहे.
जर तुम्हालाही माझ्यासारखंच वाटत असेल तर प्लीज त्याला वोट करा. आपण सगळे मिळून वोट करून त्याला जिंकवू या.”






