Saturday, December 6, 2025

पुण्यात पोलीस हवालदारानं मुलीच्या पहिल्या वाढदिवशी उचललं टोकाचं पाऊल

पुण्यात पोलीस हवालदारानं मुलीच्या पहिल्या वाढदिवशी उचललं टोकाचं पाऊल

पुणे : 'तुझा पहिला वाढदिवस दणक्यात साजरा करायचा होता पण मी पोलीस खात्यात नोकरी करतो, वरिष्ठ मला त्रास देतात. यामुळे इच्छा असूनही मी तुला वेळ देऊ शकत नाही' या शब्दात स्वतःच्या वेदना व्यक्त करत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवतचे पोलीस हवालदार निखिल रणदिवे बेपत्ता झाले आहेत. त्यांनी चिठ्ठीत यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे.

यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस टाकून पोलीस हवालदार निखिल रणदिवे बेपत्ता झाले होते.

हवालदार निखिल रणदिवे यांची बदली यवतहून शिक्रापूर येथे झाली होती. पण या बदली आदेशाची अंमलबजावणी करण्यास पोलीस निरीक्षक नारायण देशमुख टाळाटाळ करत होते; असेही चिठ्ठीत नमूद आहे.

हवालदार निखिल रणदिवे कुठे आहेत हे जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस ठिकठिकाणी शोध घेत आहेत. यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांची विभागीय चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment