Saturday, December 6, 2025

संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची संविधानाच्या डिजिटल चित्ररथाद्वारे मानवंदना

संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची संविधानाच्या डिजिटल चित्ररथाद्वारे मानवंदना

संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डिजिटल संविधान चित्ररथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन 

मुंबई: राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डिजिटल संविधान चित्ररथ तयार करण्यात आलेला आहे. या चित्ररथाचे आज दिनांक ०६ डिसेंबर, २०२५ रोजी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते रवींद्र नाट्य मंदिराच्या प्रांगणात, प्रभादेवी मुंबई येथे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा, माजी राज्यमंत्री भाई गिरकर, श्री बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, श्रीमती मीनल जोगळेकर, संचालक पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी व इतर मान्यवर उपस्थित होते.
हा चित्ररथ राज्यात विविध ठिकाणी फिरणार आहे. या चित्ररथामध्ये संविधानाची माहिती, संविधानाच्या मुलतत्त्वावरील माहिती, महत्त्वाची घडामोडी व लोकशाहीच्या मुल्यांवरील कलात्मक सादरीकरण व याबाबतचे प्रदर्शन बघायला मिळेल. या चित्ररथाद्वारे संविधान बाबतची जनजागृती करण्यात येणार आहे. संविधानाची माहिती सर्वसामान्यांना माहित व्हावी, या उद्देशाने या चित्ररथाची निर्मिती करण्यात आलेली आहे. राज्यातील जास्तीत जास्त जनतेने या चित्ररथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >