Saturday, December 6, 2025

बहरीनमध्ये जय पवारांचा विवाह; ‘झिंगाट’वर अजितदादा-रोहित पवार यांचा ठेका

बहरीनमध्ये जय पवारांचा विवाह; ‘झिंगाट’वर अजितदादा-रोहित पवार यांचा ठेका

बहरीन : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाहसोहळा बहरीनमध्ये संपन्न झाला. या सोहळ्याला ४०० पाहुणे उपस्थित होते. सोहळ्याची राज्यभर चर्चा सुरू असताना, लग्नातील अजित पवार आणि त्यांचा पुतण्या रोहित पवार यांचा संयुक्त नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

जय पवार यांचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी पुण्यातील फार्महाऊसवर झाला होता. त्यानंतर संगीत आणि हळदीचे कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आले, तर शनिवारी मुख्य विधी संपन्न झाले. वरात निघाल्यानंतर अजित पवार, त्यांची भगिनी आणि पुतणे रोहित पवार यांनी ‘सैराट’ चित्रपटातील ‘झिंगाट’ गाण्यावर ठेका धरत नाच केला

कडक आणि शिस्तप्रिय प्रतिमा असलेले अजित पवार यांना लेकाच्या लग्नात नाचताना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राजकीय मतमतांतर निर्माण झालं असलं तरी कुटुंबातील नाते अबाधित असल्याचे चित्र या नृत्यातून दिसले. रोहित पवार यांनी काका अजित पवारांसोबतची उपस्थिती आणि सहभाग यामुळे पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र दिसलं.

विवाह सोहळ्यात शरद पवार, सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार अनुपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण आले. मात्र संसदेच्या हिवाळी अधिवेशनामुळे त्यांना उपस्थित राहणे शक्य झाले नाही, अशी माहिती समोर आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >