Saturday, December 6, 2025

ICICI Prudential AMC IPO: अखेर ठरलं ! देशातील सर्वात मोठी AMC आयसीआयसीआय प्रुडेन्शियल असेट मॅनेजमेंटचा १०००० कोटीचा आयपीओ लवकरच बाजारात 'ही' असेल तारीख

ICICI Prudential AMC IPO: अखेर ठरलं ! देशातील सर्वात मोठी AMC आयसीआयसीआय प्रुडेन्शियल असेट मॅनेजमेंटचा १०००० कोटीचा आयपीओ लवकरच बाजारात 'ही' असेल तारीख

मोहित सोमण: लवकरच बहुप्रतिक्षित आयसीआयसीआय प्रुडेन्शियल असेट मॅनेजमेंट (ICICI Prudential Asset Management) आयपीओ बाजारात दाखल होणार आहे. आज कंपनीने आपल्या प्राईज बँडचीही घोषणा केली. या घोषणेनुसार कंपनीने प्रती शेअर प्राईज बँड २०६१ ते २१६५ रूपये निश्चित केला आहे. कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत ही घोषणा केली असून हा आयपीओ संपूर्णपणे ४.९० कोटी बुक व्हॅल्यू असलेल्या ऑफर फॉर सेल विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. यामध्ये फ्रेश इशू नसणार आहे म्हणजेच हे पैसे कंपनीकडे जाणार नसून बँक आपला ४.९० कोटींचा हिस्सा या निमित्ताने आयपीओतून विकणार आहे. १२ डिसेंबरला हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला असून १६ डिसेंबरपर्यंत उपलब्ध असणार आहे. बीएसई व एनएसईवर शेअर सूचीबद्ध (Listed) १९ तारखेला होणार आहे. पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) १९ डिसेंबरपर्यंत करण्यात येईल अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. Citi Group Global Markets India Private Limited ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार असून Kfin Technologies Limited आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. १ रूपये दर्शनी मूल्य (Face Value) असलेल्या ४.९० कोटी शेअरची विक्री या माध्यमातून करण्यात येईल. ४८९७२९९४ शेअर इशूसाठी उपलब्ध असतील त्यापैकी ४९४२५८२५० शेअर पब्लिक इशूसाठी उपलब्ध असून उर्वरित शेअर विविध श्रेणीतील गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असतील. माहितीनुसार या पब्लिक इशूपैकी २४४८६४९ शेअर आयसीआयसीआय बँकेच्या भागभांडवलाधारकांसाठी राखीव असणार आहेत. प्रुडेन्शियल कॉर्पोरेशन होल्डिंग्स लिमिटेड कंपनी आपले शेअर ऑफ लोड करणार आहे.

युकेची कंपनी असलेल्या प्रुडेन्शियल आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मधील १.७६ कोटी इक्विटी शेअर्सची विक्री आयपीओतून करेल. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार किमान १०००० ते १०३०० कोटींचा निधी कंपनी आयपीओतून उभारणार आहे. सगळ्या म्युच्युअल फंड हाऊसेसची तुलना पाहता बाजार भांडवल व एकूणच म्युच्युअल फंड योजना, मालमत्तेतील गुंतवणूक, व व्यवस्थापना अंतर्गत मालमत्तेत (Asset Under Management AUM) देशात प्रथम क्रमांक आयसीआयसीआय प्रुडेन्शियल असेट मॅनेजमेंट कंपनी आहे.

एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ५०% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असून किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) ३५% व विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Non Institutional Investors NII) १५% वाटा उपलब्ध असणार आहे. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ३२% अधिक महसूल मिळाला असून या आर्थिक वर्षात कंपनीला करोत्तर नफा (Profit after tax PAT) इयर ऑन इयर बेसिसवर २९% वाढला आहे. उपलब्ध आर्थिक माहितीनुसार, कंपनीच्या उत्पन्नात तिमाही बेसिसवर (MoM) मार्च महिन्यातील ४९७९.६७ कोटींच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात २९४९.६१ कोटीवर घसरण झाली आहे. कंपनीच्या करोत्तर नफ्यात मार्च महिन्यातील २६५०.६५ कोटींच्या तुलनेत १६१७.७४ कोटींवर घसरण झाली. ईबीटाही मार्च महिन्यातील ३६३६.९९ कोटीवरून सप्टेंबर महिन्यात २२१०.१० कोटींवर घसरला आहे. कंपनीचे सध्याचे ईबीटा मार्जिन ०.३६% असून आयपीओपूर्व ईपीएस (Earning per share) ५३.६३ रूपये आहे जे आयपीओनंतर वाढून ६४.४६ रूपये होईल. आयसीआयसीआय बँक, प्रुडेन्शियल कॉर्पोरेशन हे दोन कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत.

१९९३ या कंपनीची स्थापना झाली असून कंपनी देशभरात पसरलेली सर्वात मोठी असेट मॅनेजमेंट कंपनी आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीकडे सक्रिय तिमाही सरासरी मालमत्ता व्यवस्थापन (QAAUM) आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत, त्यांची एकूण मालमत्ता १०१४७.६ अब्ज डॉलर्स होती. कंपनी ऑफशोअर क्लायंटना पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (PMS), अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड (AIF) आणि सल्लागार सेवा (Consultancy Services) देते.

कंपनी म्युच्युअल फंड उद्योगात सर्वात जास्त योजनांचे व्यवस्थापन करते. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत, १४३ योजनांमध्ये ४४ इक्विटी आणि इक्विटी ओरिएंटेड योजना, २० कर्ज योजना, ६१ पॅसिव योजना, १५ देशांतर्गत फंड-ऑफ-फंड योजना, एक लिक्विड योजना, एक ओव्हरनाईट योजना आणि एक आर्बिट्रेज योजना यांचा समावेश आहे. कंपनीचे २३ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशांमध्ये २७२ कार्यालये असलेले मजबूत पॅन इंडिया वितरण नेटवर्क आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा