अमेरिका: रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये काल (५ डिसेंबर) महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद सुद्धा घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा सुरूच ठेवणार असल्याची पुतिन यांनी मोठी घोषणा केली. पुतिन यांचा हा निर्णय अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामध्ये भारत आणि रशियामध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले. ज्यामुळे आता रशिया आणि भारत यांच्यातील नाते अधिक मजबूत होण्याची शक्यता वाढली आहे. परंतु दुसरीकडे पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे अमेरिकेत मोठा भूकंप आल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कारण, अमेरिका आपली नवी नॅशनल सिक्योरिटी स्टॅटजी जारी करणार असल्याचा निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे.
नाल्याच्या रुंदीकरण कामासाठी विकासकाची केली नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील प्रभादेवी येथील साई सुंदरनगर, कामगारनगर -२ व इतर सहकारी ...
या नव्या धोरणामध्ये अमेरिकेने चीन आपला नंबर वनचा शत्रू असल्याचे म्हटले आहे. तर भारत हा आपला महत्त्वाचा भागीदार देश असल्याचे म्हटले आहे. रशियासंदर्भात देखील अमेरिकेने नरमाईचे धोरण ठेवल्याचे पहायला मिळत आहे. यासंदर्भात अमेरिकेकडून ३३ पानांचा एक रिपोर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये अमेरिकेने आता आपले नवे परराष्ट्र धोरण कसे असणार याबाबत स्पष्ट सांगितले आहे. अमेरिकेच्या या नव्या धोरणामुळे भारताला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे भारताची चीन आणि रशियासोबत जवळीक वाढली आहे. त्यानंतर आता अमेरिकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अमेरिकेने आपल्या नव्या धोरणामध्ये चीनला आपला नंबर एकचा शत्रू असल्याचे म्हटले आहे. तर भारताला आपला महत्त्वाचा भागीदार देश असल्याचे म्हटल्याने चीनला रोखण्यासाठी अमेरिकेला भारताकडून मदतीची अपेक्षा असल्याचे सुचित होते.






