टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल
विनोद रत्ना हा नव्या पिढीचा लेखक, अभिनेता व दिग्दर्शक आहे. ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ हे त्याचं व्यावसायिक नाटक रंगमंचावर आलेलं आहे. जिगीषा क्रिएशन हे नाटक सादर करीत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने आयोजित केलेल्या राज्य नाट्य परिषदेच्या स्पर्धेत या नाटकाने सर्व विभागातील पारितोषिके पटकावली.
विनोदचे बालपण पुण्यातील भोर तालुक्यात गेले. यवत त्याचे गाव; परंतु त्याचे बालपण भोर तालुक्यात गेले. जिल्हा परिषद शाळेत त्याचे पाचवीपर्यंत शिक्षण झाले, शाळेत वक्तृत्व स्पर्धेत त्याने भाग घेतला होता. त्यात त्याला बक्षीस देखील मिळाले होते. त्यानंतर भोरमधील राजा रघुनाथराव भोरमधून त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले. अकरावीत असताना त्याने काठीन घोंगडं गाण्यावर नृत्य केले होते. गरवारे रात्र कॉलेजमध्ये वर्षातून एकदा गॅदरिंगचा कार्यक्रम होत असतो. त्यामध्ये प्रत्येक वर्षी त्याने नाटकात काम केले. त्याच्या मैत्रिणीचा एक मित्र होता, जो नाटकात कामे करीत होता, त्याच्यासोबत त्याने काम केले. भरत भोईटे या पुण्यातील दिग्दर्शकासोबत बॅकस्टेज काम केले, त्यांच्या 'शहाणे शहाणे दीड शहाणे' नाटकात त्याने अभिनय देखील केला. रंगमंचावर तो गेल्यावर त्याचे कौतुक झाले. हे क्षेत्र त्याला आवडू लागले. त्याने या क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा निश्चय केला. सुरुवातीला तीन ते चार वर्षे त्याने अनेक ठिकाणी हलक्या दर्जाची कामे केली.
एकदा तो नाटक पाहायला गेला, ते नाटक त्याला आवडले नाही. नंतर त्याने ठरवले की आपणच दर्जेदार नाटके प्रेक्षकांना दिली पाहिजेत. नंतर त्याने स्वतः नाटक लिहिले व सागर पवारने दिग्दर्शित केले. ते दोन अंकी नाटक त्याने केले. त्या नाटकाला पारितोषिके मिळाली. बायको भेटेल का हे नाटकाचे नाव होते. नंतर ते नाटक थांबलं. नंतर त्याने पाच एकांकिका केल्या. यशोदा, लगीन, शिट्टी, बॉईज शुद्ध शाकाहारी, चिरंजीव परफेक्ट बिघडलाय. या साऱ्याना भरपूर बक्षिसे मिळाली.
'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय 'या एकांकिकेच्या वेळी परीक्षक म्हणून दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी होते. त्यांना ते खूप आवडले. नंतर त्याचे दोन अंकी नाटकात रूपांतर करण्यात आले. हा एक वेगळा विषय प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या नाटकामध्ये तीन पात्र आहेत. श्रेयस जोशी, वैभव रंधवे, समृद्धी कुलकर्णी ह्यांनी ती साकारली आहेत. आजच्या नात्यावर भाष्य करणारी गोष्ट आहे. प्रत्येकातल्या घरातील विषय आहे.
प्रत्येकाला आपला वाटणारा विषय आहे. लेखन करताना सुरुवातीला खूप मोठा विषय वाटत होता. तो प्रेक्षकांना कसा चांगला वाटेल याचा विचार केला गेला आहे. नवीन विषय आणून रंगभूमी समृद्ध करण्याचा प्रयत्न आहे. हे नाटक प्रेक्षकांना हसवेल तेवढेच रडवेल देखील. चंद्रकांत कुलकर्णींनी प्रायोगिक व व्यावसायिक नाटकातील फरक विनोदला सांगितला. त्याच भरपूर मार्गदर्शन त्याला लाभले. 'शहाणे शहाणे दीड शहाणे' हे नाटक त्याच्या जीवनातले टर्निंग पॉइंट ठरले. आताचे नाटक चिरंजीव परफेक्ट बिघडलाय हे नाटक देखील तो त्याच्या जीवनातील टर्निंग पॉइंट मानतो.
'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ या नाटकामुळे त्याची खऱ्या अर्थाने लेखक व दिग्दर्शक म्हणून ओळख प्रेक्षकांपुढे आलेली आहे. सध्याच्या तरुण पिढीचे, वर्तमानकाळातील या नाटकाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. या नाटकासाठी लेखक व दिग्दर्शक विनोद रत्नाला हार्दिक शुभेच्छा!






