Saturday, December 6, 2025

मोठी बातमी - या वर्षाच्या आत भारत अमेरिका व्यापारी करार होणार पडद्यामागे राजकीय हालचाली सुरू

मोठी बातमी - या वर्षाच्या आत भारत अमेरिका व्यापारी करार होणार पडद्यामागे राजकीय हालचाली सुरू

प्रतिनिधी: यावर्षाच्या अखेरीस भारत व युएस यांच्यातील द्विपक्षीय करार (Bilateral Free Trade Agreement FTA) तडीस जाण्याची शक्यता आहे. तसे संकेत २८ नोव्हेंबरला वाणिज्य विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले होते. ते म्हणाले, 'या कॅलेंडर वर्षाच्या अखेरपर्यंत सकारात्मक दिशा मिळत असल्याने हे एफटीए पूर्णत्वास येऊ शकते.' त्यामुळे प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, १० डिसेंबरपर्यंत थांबलेली बोलणी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. अडकलेल्या मुद्यांवर यामध्ये चर्चा अपेक्षित असून त्याचा परिणाम भारतावर लादलेल्या अतिरिक्त ५०% टॅरिफमध्ये कपात होईल का हे पाहणे यावेळी महत्वाचे ठरेल.

एफआयसीसीआय (FICCI) च्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करताना अग्रवाल म्हणाले आहेत की,'जागतिक व्यापार परिस्थितीत अलीकडच्या काळात झालेल्या बदलानंतरही युएस भारत चर्चेत लक्षणीय प्रगती झाली आहे. आतापर्यंत झालेल्या वाटाघाटींचा विचार करताना ते म्हणाले, मला वाटते की आमच्या अपेक्षा आहेत आम्ही खूप आशावादी आहोत आणि या कॅलेंडर वर्षातच आपल्याला तोडगा निघेल अशी आशा आहे.'

भारत आणि अमेरिका सुरुवातीला २०२५ कराराचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवत असले तरी तथापि त्यांचे अंतिम स्वरूप अद्याप गुलदस्त्यातच आहे. तथापि भूराजकीय अस्थिरतेच्या कारणांमुळे बाजारात चर्चासत्रासाठी अनुकुल वातावरण नव्हते दरम्यान अमेरिकेच्या व्यापार धोरणातील नवीन घडामोडी, अतिरिक्त कर याचा टाइमलाइनवर परिणाम झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑगस्टपासून भारतीय वस्तूंवर २५% शुल्क लादले, त्यानंतर रशियाशी आर्थिक संबंध ठेवत असल्याचा बहाणा करत भारतावर अतिरिक्त २५% करात वाढ केली, भारताने रशियन तेल खरेदी सुरू ठेवल्याचे कारण देत अमेरिकेने व्यापार तूट असलेल्या अनेक देशांवर असेच शुल्क लादले आहे असे म्हटले. काही प्रमाणात दोन्ही देशांच्या संबंधात कटूता आली होती. परंतु मोदी व ट्रम्प यांनी एकमेकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधल्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांची स्तुती केली होती

दोन्ही राष्ट्रांच्या नेतृत्वाच्या निर्देशांनंतर फेब्रुवारीमध्ये औपचारिकपणे प्रस्तावित केलेला बीटीए (द्विपक्षीय करार) २०३० पर्यंत सध्याच्या १९१ अब्ज डॉलर्सवरून ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचा असल्याचे सांगितले जाते. कराराला अंतिम रूप देण्यासाठी आधीच अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वर्षाच्या सुरुवातीला वॉशिंग्टन भेटीदरम्यान पहिल्यांदाच या चर्चेची घोषणा करण्यात आली होती.

निर्यातीला चालना देण्यासाठी भारताने इतर काही देशांत १४ मुक्त व्यापार करार (FTA) आणि सहा प्राधान्य व्यापार करार (PTA) केले आहेत. भारत सध्या इतर अनेक देशांसोबतही एफटीएसाठी वाटाघाटी करत आहे आणि अंतिम टप्यात पोहोचलेली युरोपियन युनियन सोबत चर्चा सुरू भारताने सुरू ठेवली आहे.

काल नवी दिल्ली येथे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि युरेशियन इकॉनॉमिक युनियन यांच्यातील वस्तूंवरील मुक्त व्यापार करारावर संयुक्त काम मजबूत सुरू ठेवले गेल्याने कौतुक केले होते. गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि संरक्षण देण्याबाबत परस्पर फायदेशीर करारावर वाटाघाटी पुढे नेण्याचे प्रयत्नही नेत्यांनी निर्देश भारत व रशियानेही नुकतेच दिले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >