Friday, December 26, 2025

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा दौरा भारत आणि रशिया या दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. कारण, यात व्यापार आणि संरक्षण तसेच ऊर्जा करार होण्याची शक्यता आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुतिन यांच्या दौऱ्याच्या काही दिवसांआधी भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत शुभ बातमी आली.

भारताचा जीडीपी जुलै ते सप्टेंबरमध्ये ८.२ टक्के ग्रोथ रेटने वाढला आहे. सध्या भारत ४.३ ट्रीलियन डॉलरच्या जीडीपीसह जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था आहे.तर रशिया २.५४ ट्रीलियन डॉलर जीडीपीसह नवव्या क्रमांकावर आहे. मात्र रशियाची करन्सी आणि भारतीय रुपयांची तुलना केली तर यात जास्त अंतर नाही.

Xe कन्वर्टरच्या अनुसार रशियाच्या एका रुबलची किंमत भारतात १.१६ रुपयांच्या बरोबर आहे. म्हणजे दोन्हीत केवळ १६ पैशांचे अंतर आहे.रशियाच्या रुबलची किंमत भारतीय रुपयांपेक्षा १६ पैसे जास्त आहे. भारताचा एक रुपया ०.८५ रशियन रुबलच्या बरोबर आहे. डॉलरशी तुलना करता एका डॉलरची किंमत ७७.२० रशियन रुबलच्या बरोबर आहे. तर एक अमेरिकन डॉलर भारतात ९० रुपयांच्या बरोबर आहे.

Comments
Add Comment